सोनमच्या बेबी शॉवरपेक्षा ‘दाढी-मिशां’मध्ये सोनमच्या बेबी शॉवरला हजेरी लावणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचीच जोरदार चर्चा, नेटकरी म्हणाले…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची फॅशनिस्त म्हणून ओळखली जाणाऱ्या सोनम कपूरला मातृत्वाची चाहूल लागल्यापासून तिच्या येणाऱ्या प्रत्येक दिवशी तिला काहीतरी वेगळे अनुभवायला भेटत आहे. प्रेग्नंसीदरम्यानचे फोटोशूट असो किंवा बेबीमूनच्या निमित्ताने फिरणे असो.

सोनमला या दिवसांमध्ये शक्य तेवढा आनंद देण्यास तिचा पती आनंद अहुजा कुठे देखील चुकत नाहीय. पण सध्या सोनमच्या बेबी शॉवरची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. बेबी शॉवर म्हंटले कि त्याची थीम, आऊटफिट, पार्टीचा मेन्यू या सर्व गोष्टीं विशेष लक्ष वेधून घेत असतात.

पण सध्या सोनमच्या बेबी शॉवरपेक्षा तिच्या या कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेल्या एका पाहुण्याचीच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या पाहुण्यावर सध्या नेटकऱ्यांच्या नजरा वारंवार खिळल्या आहेत. वन पीस, त्यावर तितकीच ज्वेलरी, साजेसा मेकअप अशा रुपामध्ये हि व्यक्ती पाहायला मिळत आहे.

हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मिडियावर एका पुरुषाला अशा रुपामध्ये पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. सोनमसोबत पाहायला मिळणारा हा व्यक्ती कोण अशीच चर्चा सर्वत्र होत आहे. सोनमच्या लंडनच्या घरी झालेल्या या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत असलेला हा व्यक्ती म्युझिशियन लिओ लिओ कल्याण आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Leo Kalyan (@leokalyan)

लिओने सोनमच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन देखील केले. पण त्याच्या कलेला दाद मिळण्यापेक्षा त्याला ट्रोल जास्त केले जात आहे. लिओचा हा लुक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला नाही.नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करत हा कुठला ड्रेसिंग सेन्स आहे असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. दरम्यान बेबी शॉवरमध्ये सोनम एका विशेष लुकमध्ये पाहायला मिळाली. डार्क लिपस्टीक आणि मिनीमल मेकअप असा साजेसा मेकअप यावेळी तिने केला होता.

Leave a Comment