“राधिका आपटेने मला अर्ध्या झोपेत…”, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितला ‘तो’ किस्सा…

By Viraltm Team

Published on:

छोट्या पडद्यावरील बस बाई बस हा शो महिलांमध्ये खूपच लोकप्रिय शो बनत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामधून या शोमध्ये महिला सहभागी होत असतात. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता सुबोध भावे या शोला होस्ट करत आहे. नुकतेच या शोमध्ये मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली होती. यादरम्यान अभिनेत्री सोनालीने अनेक खुलासे केले. बस बाई बस शोदरम्यान सोनालीने अगदी दिलखुलास प्रश्नांची उत्तरे दिली. या शोदरम्यान सोनालीला सुबोधने तुझ्यासमोर इतर अभिनेत्रींचे कौतुक केलेलं तुला आवडते का ? असा प्रश्न विचारला.

प्रशाचे उत्तर देताना सोनाली म्हणाली कि मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांचे कौतुक केलेले मला खूप आवडते. यावर सुबोध म्हणाला कि राधिकाने तुखी एकदा झोप उडवली होती असे आम्ही ऐकले आहे.

हा प्रश्न ऐकल्यानंतर अभिनेत्री हसली आणि म्हणाली कि मी पुण्यामध्ये रेस्टॉरंट चित्रपटाचे शुटींग करत होते. मी रात्री शुटींग संपवून घरी परत येऊन गाढ झोपले होते. यानंतर तासाभरातच आईने मला उठवले आणि म्हणाली कि तुझी मैत्रीण आली आहे. मी अर्धवट झोपेतून उठले आणि बघायला गेले, तर एक सुंदर मुलगी उभी होती.

ती मुलगी राधिका आपटे होती. आम्ही त्यावेळी एकमेकीना ओळखत नव्हतो. मी तिला विचारले कि तू कोण आहेस ? यावर ती म्हणाली कि मी राधिका आहे आणि तुझा नवरा मला ओळखतो. राधिका तेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन होती. मुंबईला तिला करियर करायला यायचे होते. तेव्हा राधिकाने केलेल्या धाडसाचे तिला खूपच कौतुक वाटले.

सोनाली पुढे म्हणाली कि, त्यानंतर देखील तिने मला एकदा मार्गदर्शन घेण्यासाठी मला फोन केला होता. वास्तविक मी कॉलर उभी करायला पाहिजे कारण जेव्हा राधिका कठीण परिस्थितीमधून जात होती तेव्हा ती माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी येत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

Leave a Comment