मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी सोनाली फोगाटने शेयर केला होता ‘हा’ तिचा शेवटचा व्हिडीओ…

By Viraltm Team

Published on:

सोशल मिडिया स्टार आणि भारतीय जनता पार्टी नेत्या सोनाली फोगाटच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सोनाली फोगाटला वयाच्या ४१ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराचा झटका आला. यादरम्यान तिचा मृत्यू झाला. असे म्हंटले जात आहे कि ती काही स्टाफ मेंबर्ससोबत गोव्याला गेली होती. मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी सोनाली फोगाटने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला होता.

टिक टॉकमधून फेमस झालेली सोनाली फोगाट सोशल मिडियावर खूपच सक्रीय होती आणि आपले एकापेक्षा एक जबरदस्त फोटो आणि रील्स ती शेयर करत असायची. सोनाली फोगाटने काही तासांपूर्वी आपला एक शेवटचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर केला होता.

तिच्या या व्हिडीओबद्दल बोलायचे झाले तर ती व्हिडीओमध्ये गुलाबी पगडी घालून बॉलीवूडचे रेट्रो साँग रुख से जरा नकाब हटा दो या गाण्यावर रील बनवताना आणि एक्सप्रेशन देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली आनंदाने धावताना दिसत आहे.

याच्या काही वेळापूर्वी सोनालीने आपल्या सुंदर लुकचे काही सेल्फी देखील चाहत्यांसोबत शेयर केले होते. सोशल मिडियावर आता तिच्या या पोस्टवर हैराणी व्यक्त केली जात आहे आणि तिच्या आत्म्याच्या शांतीची कामना केली जात आहे. पोस्टवर कमेंट करून तिला श्रद्धांजलि देखील दिली जात आहे.

सोनाली फोगाटचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी हरियाणाच्या फतेहाबादमध्ये झाला होता. २००६ मध्ये तिने आपले करियर हिसार दूरदर्शन अँकरिंग करून सुरु केले होते. २००८ मध्ये तिने भाजपामध्ये प्रवेश केला होता. तिचे लग्न तिच्या बहिणीच्या दिरासोबत लावून दिले गेले होते. ती नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहायची. तिने बिग बॉस सीजन १४ मध्ये आपल्या आयुष्यामधील वेदना दर्शकांसोबत शेयर केल्या होत्या. तिचा मृत्यू तिच्या पतीप्रमाणेच रहस्यमयी आहे.

Leave a Comment