पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची गो’ळ्या घालून ह’त्या करण्यात आली आहे. अज्ञात इसमांनी केलेल्या या ह’ल्ल्या’मध्ये मुसेवाला यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
पंजाबच्या भगवंत मान सरकारने ४२४ महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये सिद्धू मुसेवाला यांचा देखील समावेश होता. सुरक्षा काढून घेतल्यानंतर ठीक दुसऱ्या दिवशी हि घटना घडली आहे.
माहितीनुसार गायक आणि काँग्रेसचे नेते मुसेवाला हे आपल्या मित्रांसोबत आपल्या राहत्या घरी माणसा येथे जात होते. यावेळी प्रवासादरम्यानच त्यांच्यावर ह’ल्ला करण्यात आला. ह’ल्ला इतका जबर होता कि मुसेवाला यांचे जागीच निधन झाले आणि त्यांचे दोन मित्र जखमी झाले.
नुकतेच मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पंजाबच्या विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांचा आम आदमी पक्षाचे विजय सिंग यांनी ६३,३२३ मातांनी पराभव केला. सिद्धू मुसेवाला हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक देखील होते.
गेल्याच वर्षी सिद्धू मुसेवाला यांची काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान या हत्येनंतर काँग्रेसने रोष व्यक्त करत भगवंत मान सरकारला सर्वस्वी जबाबदार धरले आहे. त्याचबरोबर भाजपने देखील पंजाब सरकारवर जहरी टीका केली आहे.