प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर जुबीन नौटियालचा गुरुवारी सकाळी अपघात झाला आहे. त्याला मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार इमारतीच्या पायऱ्यांवरून पडल्यानंतर सिंगरचा कोपरा आणि फासळी तुटली आहे. त्याच्या डोक्याला देखील दुखापत झाली आहे.
अपघातानंतर जुबीनच्या उजव्या कोपरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. नुकतेच त्याचे तू सामने आए, मानिके आणि इतर काही गाणी सुपरहिट झाली आहेत. भारतीय म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जुबीनने स्वतःसाठी एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याने लंबिया, लुट गए, हमनवा मेरे और तुझे कितना चाहने लगे हम, तुम ही आना, बेवफा तेरा मासूम चेहरा सारखी सुपरहिट गाणी गायली आहेत.
डॉक्टरांनी त्याला सल्ला दिला आहे आहे कि त्याने उजव्या हाताचा वापर करू नये. गेल्या आठवड्यामध्ये जुबीनने दुबईमध्ये लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केले होते. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला कि दुबईतील लोकांसमोर परफॉर्म करणे हा एक वेगळा अनुभव आहे.
मी तिथे परफॉर्म करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो आणि आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत राहीन. जुबीनने म्हंटले होते कि काही दिवसांमध्ये फेस्टिव सीजन सुरु होणार आहे आणि मला उत्सवाची तयारी करण्यासाठी संगीतापेक्षा चांगले काहीही वाटत नाही.
नुकतेच जुबीनने एका मुलाखतीदरम्यान त्याने गायलेल्या गाण्यांबद्दल बातचीत केली, ज्यावर त्याला पुन्हा काम करण्याची इच्छा आहे. त्याने म्हंटले होते कि अशी अनेक गाणी आहेत ज्यांना मला कंपोज करायचे आहे. यामधी एक गाणे आहे जे माझ्या करियरच्या सुरुवात्तीपासून आहे. एक प्यार का नगमा है. बड़ी दूर से आए हैं प्यार का तोहफा लाए हैं हे देखील गाणे आहे. ज्याला त्याच्या लिरिक्समुळे ` कंपोज करण्याची इच्छा आहे. जेव्हा मी खूप छोटा होतो तेव्हा हे जीवन ही गाणे गायले होते, तेव्हा मला हे देखील माहिती नव्हते कि या गाण्याचे कंपोजर कोण आहे म्युझिकची प्रोसेस काय आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.