बॉलिवूडचे न्यूली वेड्स कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. नुकतेच कपलने आपल्या हळदीचे फोटो शेयर करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आता दोघांनी लग्नानंतर पहिल्यांदाच होळी सेलिब्रेशनचा एक फोटो देखील सोशल मिडियावर शेयर केला आहे. जो सध्या खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघे रंगाने माखलेले पाहायला मिळत आहेत.
लग्नानंतर दोघांची हि पहिलीच होळी आहे. फोटो शेयर करत सिद्धार्थने लिहिले आहे कि मिसेससोबत पहिली होळी. सिद्धार्थच्या या पोस्टला पुन्हा एकदा चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. एका चाहत्याने फोटोवर कमेंट करत मोस्ट अवेटेड होळीचा फोटो असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि क्यूट कपलला होळीच्या शुभेच्छा.
याशिवाय आणखी एकाने हॅपी होळी मिस्टर आणि मिसेस बत्रा असे लिहिले आहे. यापूर्वी कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या हळदी फंक्शनचे फोटो चाहत्यांसोबत शेयर केले होते. हे फोटो शेयर करताच त्यांना सर्वांनी होळीच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. फोटोमध्ये दोघे एकमेकांना हळद लावताना पाहायला मिळत आहेत.
कियारा आणि सिद्धार्थने याच वर्षी ७ फेब्रुवारी रोजी लग्न केले होते. दोघांचे लग्न जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये झाले होते. ज्यामध्ये दोघांच्या कुटुंबाव्यतिरिक्त अनेक बॉलिवूड स्टार्सही सहभागी झाले होते. लग्नानंतर या जोडप्याने मुंबई आणि दिल्लीमध्ये त्यांच्या मित्रांसाठी रिसेप्शन देखील आयोजित केले होते.
View this post on Instagram