दोन मुलांची आई असलेल्या ‘या’ अभिनेत्रीसोबत सिद्धार्थ मल्होत्राला करायचे आहे लग्न, तिच्या पतीलाच बनवायचे आहे आपला भाऊ…

By Viraltm Team

Published on:

हिंदी चित्रपटामधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने गेल्या वर्षी आलेल्या शेरशाह चित्रपटामुळे खूपच लोकप्रियता मिळवली होती. चित्रपट शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटामुळे सिद्धार्थ मल्होत्राच्या फिल्मी करियरला नवीन पंख मिळाले. चित्रपटामध्ये दर्शकांचे मन जिंकले होते.

जवळ जवळ १० वर्षांपासून सिद्धार्थ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. ३४ वर्षीय सिद्धार्थने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात २०१२ मध्ये स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटामधून केली होती. करण जौहरच्या या चित्रपटामधून सिद्धार्थसोबत वरून धवन आणि आलिया भट्टने देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती.

सिद्धार्थचा पहिलाच चित्रपट हिट झाला होता. तथापि यानंतर सिद्धार्थचे फिल्मी करियर तितकेसे खास राहिले नाही. पण सिद्धार्थला शेरशाहने मोठी सफलता मिळवून दिली. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार प्रदर्शन केले होते. तसे तर आज आपण सिद्धार्थच्या फिल्मी करियरवर नाही तर त्याच्या एका वक्तव्याबद्दल चर्चा करत आहोत. सिद्धार्थने एकदा एका विवाहित अभिनेत्री आणि दोन मुलांची आई असलेल्या अभिनेत्री सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

सिद्धार्थ मल्होत्रा एकदा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक कारण जौहरच्या कॉफी विथ करण च्या शोमध्ये पोहोचला होता. तेव्हा बातचीतदरम्यान सिद्धार्थ मल्होत्राने एका विवाहित अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्याच्या या विधानाने सर्वांनाच हैराण केले होते.

करण जौहरने सिद्धार्थला प्रश्न विचारला होता कि तुला कोणत्या अभिनेत्रीला पत्नी म्हणून पाहायला आवडेल ? यावर उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाल होता कि करीना कपूर खानला माझी पत्नी म्हणून पाहायला आवडेल. त्याने म्हंटले होते कि त्याला करीनासोबत लग्न करायचे आहे. तर त्याला पुढचा प्रश्न विचारला गेला कि कोणत्या स्टारला आपला भाऊ बनवायला आवडेल ?
सिद्धार्थने याचे उत्तर देखील मजेदार दिले होते. तो म्हणाला होता कि मला करीना कपूर खानचा पती सैफ आली खानला माझा भाऊ बनवायला आवडेल. सिद्धार्थच्या या मजेदार उत्तराने करण जौहर देखील हैराण झाला होता.

करण जौहरचा चॅट शो कॉफी विथ करण सध्या खूपच चर्चेमध्ये आला आहे. सोशल मिडियावर याबद्दल खूपच चर्चा होत आहेत. असे म्हणले जात आहे कि या सीजनमध्ये देखील सिद्धार्थ मल्होत्रा शोमध्ये सहभागी होणार आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल कि यावेळी सिद्धार्थ करणच्या शोमध्ये कोणते खुलासे करतो. सिद्धार्थ करीनाला खूपच पसंद करतो. तिचा मोठा चाहता आहे. २०१५ मध्ये आलेल्या ब्रदर्स चित्रपटामध्ये तिने आयटम साँग केले होते.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment