कियारा अडवाणीला विसरून नोरा फतेहीसोबत असे चाळे करतोय सिद्धार्थ मल्होत्रा, पाठीमागून हात घालत होता तिच्या…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी थँक गॉड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मिडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. प्लॉटसोबत ट्रेलरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि नोरा फतेहीची जोडी सर्वात चर्चेमध्ये आली आहे. ट्रेलरमध्ये सिद्धार्थ आणि नोराला काही सेकंदाचाच स्क्रीन स्पेस मिळाला आहे पण प्रत्येकाला हि जोडी खूपच पसंद येत आहे.

ट्रेलर रिलीजसोबत हे स्पष्ट झाले आहे कि थँक गॉड या दिवाळीमध्ये चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटामध्ये यमराज आणि चित्रगुप्तला नवीन लुकमध्ये दाखवण्यात येणार आहे. ३ मिनिट ६ सेकंदाच्या या ट्रेलरची सुरुवात अयान कपूरच्या अपघाताने होते. नंतर पुढच्या सीनमध्ये तो स्वत:ला यमलोका पाहतो.

जिथे त्याच्यासमोर पाप-पुण्याचा पाढा वाचणारा चित्रगुप्त म्हणजेच अजय देवगन आहे. मॉर्डन चित्रगुप्त अयान कपूरसोबत एक गेम खेळतो ज्याला गेम ऑफ लाइफ म्हणतात. ट्रेलर खूपच रंजक आहे. सध्या रिलीज होणाऱ्या चित्रपटांपेक्षा हा चित्रपट खूपच वेगळा आहे.

थँक गॉडमध्ये रकुल प्रीत सिंग एका पोलिसाची भूमिका साकारत आहे जी सिद्धार्थची पत्नी आहे आणि तिला त्याचा हेवा वाटतो. नोरा फतेही देखील चित्रपटामध्ये खूपच ग्लॅमरस भूमिकेत पाहायला मिळत आहे. थँक गॉड या दिवाळीला २५ ऑक्टोबर २०२२ रोजी रिलीज होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. चित्रपटाला इंद्र कुमारने दिग्दर्शित केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

याआधी पोस्टर रिलीजसोबत या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या राम सेतूसोबत होणे निश्चित झाले आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाबद्दल कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. तथापि असे म्हंटले जात आहे कि रामसेतूला दिवाळीला रिलीज करण्यात येणार आहे. यावर्षी अजय देवगनने रनवे – ३४ सारखा फ्लॉप चित्रपट दिला आहे तर अक्षय कुमारने तर फ्लॉप चित्रपटांची हॅटट्रिक केली आहे. जर हि टक्कर झाली तर दोन्ही चित्रपटांना नुकसान होऊ शकते.

Leave a Comment