कॅमेऱ्यामसमोर कोझी झाले सिद्धार्थ-कियारा, पहा लग्नाचे न पाहिलेले फोटोज…

By Viraltm Team

Published on:

२०२३ च्या सुरुवातीला बॉलीवूडचे दोन लव्ह बर्ड्स कायमचे एकमेकांचे झाले. हे दोन्ही कलाकार दुसरे कोणी नसून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आहेत. या दोघांनी आपले लग्न शाही बनवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. वेडिंग लोकेशन पासून ते आउटफिट आणि खाण्यापिण्याच्या गोष्टीवर मोठी रक्कम खर्ची करण्यात आली.

या लग्नाचे फोटोज तर कियारा आणि सिद्धार्थने आपल्या लग्नाच्या रात्रीच शेयर केले होते पण आता दोघांच्या लग्नाचे आणखी काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये दोन्ही कलाकार एकमेकांसोबत कोजी पोज देताना पाहायला मिळत आहेत.

सर्वात पहिला सिद्धार्थ आणि कियाराचा हा फोटो पाहायला. हा फोटो जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमधील आहे. या पॅलेसमध्ये दोन्ही कलाकार लग्नाच्या ड्रेसमध्ये भांगडा करताना दिसत आहेत. तर या फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ कॅमेऱ्यासमोर मस्ती करताना दिसले.

फोटोमध्ये कियारा आपला ब्राइडल पिंक कलरचा लेहेंगा घातलेली दिसत आहे. तर सिद्धार्थ क्रीम आणि गोल्डन कलरची कॉम्बिनेशनची शेरवानी घातलेला दिसत आहे. फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ कोजी होऊन कॅमेऱ्यासमोर पोज देत आहेत.

कियारा जिथे कॅमेऱ्याकडे पाहत आहे तर सिद्धार्थ तिला प्रेमाने पाहताना दिसत आहे. आता जर मंडपाचा हा फोटो पहा. हा फोटो जयमाला नंतरचा आहे. कियारा सिद्धार्थ मंडपामध्ये प्रेमाने पाहत आहेत आणि हसताना दिसत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराने आपल्या लग्नामध्ये मनीष मल्होत्रा डिझायनर वेडिंग आउटफिट घातले होते. लग्नानंतर हे दोन्ही स्टार्स मनीष मल्होत्रा आणि संपूर्ण टीमसोबत पोज देताना पाहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Femina (@feminaindia)

 

View this post on Instagram

 

A post shared by WedMeGood (@wedmegood)

Leave a Comment