शेरशाह चित्रपटामध्ये मुख्य भूमिका करणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या चाहत्यांची संख्या लाखोंचा घरात आहे. बातमीनुसार दोन्ही कलाकार एकमेकांना डेट देखील करत आहेत.
काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने स्वतः कियारासोबत आपल्या नात्याची पुष्टी केली आहे आणि आता या कपलसंबंधी आणखीन एक गुड न्यूज समोर आली आहे. एका काम आहे जे सिद्धार्थला कियारासोबत लग्नाच्या अगोदरच करायचे आहे आणि चाहते या बातमीमुळे खूपच खुश आहेत.
काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करणच्या नवीन एपिसोडचा प्रोमो रिलीज करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये करणने सिद्धार्थला म्हंटले कि आता तू कियाराला डेट करत आहेस मग लग्नाचा प्लान काय आहे. यावर सिद्धार्थने नाकारले नाही आणि वरून म्हंटले कि तो शोच्या काऊचवर या गोष्टीला मॅनिफेस्ट करत आहे. करणने जेव्हा म्हंटले कि तू लग्नाला मॅनिफेस्ट करत आहेस का ? तर सिद्धार्थ यावर हसू लागला आणि त्याने अशी प्रतिक्रिया दिली कि त्याला काही ऐकूच आले नाही.
हा प्रोमो रिलीज झाल्यानंतर काही वेळामध्ये हि बातमी समोर आली कि सिद्धार्थ आणि कियारा शेरशाहनंतर आता आणखीन एका नवीन चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियारा अदल बदल नावाच्या चित्रपटामध्ये काम करणार आहेत जी एक लव स्टोरी असेल. या स्टोरीमध्ये सिड आणि कियाराच्या आत्मा बदलणार आहेत. हा रोमँटिक चित्रपट सुनीर खेतरपाल प्रोड्यूस करणार आहेत.
नुकतेच शेरशाह चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले होते. ज्यामुळे सिद्धार्थ आणि कियाराने एकत्र इंस्टाग्राम लाइव्ह करून सेलिब्रेट केले होते. कियाराचा वाढदिवस देखील दोघांनी एकत्र दुबईमध्ये साजरा केला होता.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.