मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी सिद्धार्थ जाधव एक मानला जातो. सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहत असतात. पण सध्या दोघे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आले आहेत.
सोशल मिडियावर तृप्तीने केलेल्या बदलामुळे सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधान आले आहे. तृप्तीनेने आपल्या सोशल मिडियावर अकाऊंटमधील नावामध्ये बदल करून तृप्त्पी अक्कलवार असे नाव केले आहे. तृप्तीने आपल्या नावातील जाधव नाव काढले आहे.
अशामध्ये आता सिद्धार्थ आणि तृप्ती जाधव यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आपल्या कुटुंबासोबत व्हेकेशनला गेला होता. त्यादरम्यानचे काही फोटो सिद्धार्थने शेयर केले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती एकत्र नसल्याची माहिती समोर आली आहे. पण अभिनेता सिद्धार्थने यावर काहीच वाच्यता केलेली नाही. सिद्धार्थ आणि तृप्तीचे २००७ मध्ये लग्न झाले होते त्यांना दोन मुली आहेत ज्यांची नावे इरा आणि स्वरा अशी आहेत.
सिद्धार्थ आणि तृप्ती झलक दिखला जा या रियालिटी शोमध्ये देखील पाहायला मिळाले होते. शोमधील दोघांची केमेस्ट्री दर्शकांना खूपच आवडली होती. अभिनेता सिद्धार्थने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. आपल्या हटके अभिनयामुळे सिद्धार्थ ओळखला जातो.
सध्या सिद्धार्थ त्याच्या आगामी येणाऱ्या चित्रपटामुळे देखील खूप चर्चेमध्ये होता. या चित्रपटाचे नाव दे धक्का २ असे आहे. त्याचबरोबर त्याने डान्स महाराष्ट्र डान्स सीझन १ मध्ये परीक्षक म्हणून देखील काम केले होते. त्याचा तमाशा लाईव्ह चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.