छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी प्रोफेशनल लाईफसोबत आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहिली. जिथे श्वेता तिवारीने अभिनय जगतामध्ये एक मोठे यश मिळवले तिथे तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तिला अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. श्वेता तिवारीने दोन लग्न केले तरीही तिला दोन्ही लग्नामध्ये सुख मिळाले नाही.
नुकतेच श्वेता तिवारीने सांगितले कि तिचा एक्स हसबंड राजा चौधरी तिला मुलीच्या समोर मारहाण करायचा. याशिवाय श्वेता तिवारीने राजा चौधरीबद्दल अनेक खुलासे केले. चला तर जाणून घेऊया श्वेता तिवारीच्या आयुष्यामधील काही किस्से.
श्वेता तिवारीचे पहिले लग्न वयाच्या १८ व्या वर्षी झाले होते. तिने राजा चौधरीसोबत लग्न केले होते. ज्यानंतर तिला एक मुलगी पलक तिवारी झाली. यादरम्यान श्वेता तिवारीला एकता कपूरच्या कसौटी जिंदगी कीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि या शोमध्ये ती घराघरामध्ये फेमस झाली. पण त्यादरम्यान तिचा पती राजा चौधरी तिला त्रास देऊ लागला आणि मुलगीसमोर श्वेताला मारहाण करू लागला.
नुकतेच श्वेता तिवारी आपल्या जुन्या दिवसांना आठवत भावुक होताना पाहायला मिळाली. आपल्या एक्स हसबंड राजा चौधरीबद्दल सांगताना श्वेता म्हणाली कि, पलक १२ वर्षाची होती, जेव्हा मला खूप त्रास दिला जात होता. राजा चौधरी मला मारत असे तो असे पलकसमोर करायचा. तथापि पलकला वाटत होते कि एक पिता म्हणून तो तिच्यावर प्रेम करेल कारण राजा चौधरीला ती टीव्ही वर पाहत होती. राजाने माझाबद्द्ल खोटेनाटे सांगितले. त्याने हे देखील म्हंटले कि मला तो मुलीला भेटू देणार नाही.
राजा चौधरीपासून वेगळे झाल्यानंतर श्वेता तिवारीने २०१३ मध्ये अभिनव कोहलीसोबत लग्न केले. दोघांची पहिली भेट जाने क्या बात है सिरीयलच्या सेटवर झाली होती. असे म्हंटले जाते कि सुरुवातीला हे दोघे चांगले मित्र बनले यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि नंतर लग्नाचा निर्णय घेतला. अभिनव सोबत लग्न केल्यानंतर श्वेता तिवारीला एक मुलगा झाला. पण यादरम्यान अभिनव आणि श्वेता दरम्यान मतभेद निर्माण होऊ लागले आणि या दोघांचे नाते देखील तुटले.
दोन्ही पतींपासून वेगळे झाल्यानंतर श्वेता तिवारीने एकट्याने आपल्या दोन मुलांचा सांभाळ केला. जिथे तिचा मुलगा शिकत आहे तर तिची मुलगी पलक म्युजिक व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली आहे. पलकचे म्हणणे आहे कि आता तिला आपल्या आईची मदत करायची आहे. तिने आमच्यासाठी बरेच काही सहन केले आहे.
पलकने गेल्या काही मुलाखतीदरम्यान म्हंटले होते कि, माझे अंतिम ध्येय हे आहे कि मला माझ्या कुटुंबासाठी असे काम करायचे आहे ज्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीची चिंता करावी लागू नये. माझी आई नेहमी एकटी कमवत होती. मी तिला त्या दबावामधून बाहेर काढणार आहे. मला माझ्या भावाला खूप शिकवायचे आहे.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.