चित्रपटामधील एका सीनसाठी ‘हि’ अभिनेत्री प्रत्यक्षात राहिली होती गर्भवती, ४५ मिनिटाच्या शूटनंतर कॅमेऱ्यासमोरच दिला होता मुलीला जन्म…

By Viraltm Team

Published on:

साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री श्वेता मेनन एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. १९७४ रोजी चंडीगडमध्ये श्वेताचा जन्म झाला होता. अभिनेत्री आता ४७ वर्षांची आहे. तिचे वडील भारतीय वायु सेनेमध्ये ऑफिसर होते तर आई घरामध्ये राहून कुटुंबाची देखभाल करत होती.

९० च्या दशकाच्या सुरुवातीला श्वेता मेननने मल्याळी चित्रपटांमधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. अनेक ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतल्यानंतर श्वेता मेननला बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. श्वेताने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

अभिनेत्री श्वेताला तिच्या अभिनयासाठी देशविदेशामध्ये ओळखले जाते. श्वेताचा सर्वात चर्चित चित्रपट कलीमन्नू आहे. चित्रपटामधील एका सीनमुळे ती खूपच चर्चेमध्ये आली होती. या चित्रपटामध्ये तिने आपल्या खऱ्या डिलिव्हरीचा सीन शूट केला होता.

वास्तविक २०१३ मध्ये आलेल्या कालीमन्नू चित्रपटामधील एका सीनसाठी दिग्दर्शक ब्लेसी यांनी लाईव डिलिव्हरी शूट करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट महिलांसमोर येणाऱ्या आव्हानांवर बनवण्यात आला होता. तथापि शुटींग पैशांसाठी केली गेली नव्हती. डिलिव्हरीची रेकॉर्डिंग त्यावेळी सुरु करण्यात आली होती जेव्हा श्वेता पाच महिन्यांची गर्भवती होती. ३ तासाच्या चित्रपटामध्ये लाइव डिलिव्हरीचा सीन तब्बल ४५ मिनिटांचा होता.

श्वेताने मुलीला जन्म दिला होता. डिलिव्हरी रूममध्ये तीन कॅमेरे लावण्यात आले होते. या शूट दरम्यान हॉस्पिटलचे डॉक्टर आणि नर्स शिवाय चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमचे तीन मेंबर्स होते. श्वेताच्या या निर्णयामध्ये तिच्या पतीने देखील तिची साथ दिली होती. चित्रपटाचे रिलीज सहा महिने थांबवण्यात आले होते जेणेकरून डिलिव्हरीचा सीन शूट व्हावा. चित्रपटाला दर्शकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. दर्शक देखील अभिनेत्रीचा हा सीन पाहून दंग झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shwetha Menon (@shwetha_menon)

बॉलीवूडमध्ये जवळ जवळ ३० चित्रपटांमध्ये काम केलेली श्वेता आपल्या फिल्मी करियरमध्ये फार काही कमाल दाखवू शकली नाही पण साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती एक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटामध्ये काम करण्याशिवाय श्वेता मेननने अनेक टीव्ही शो, अवॉर्ड फंक्शन आणि इतर अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचे अँकरिंग केले आहे.

Leave a Comment