प्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार कमल हासनची मुलगी श्रुती हसनने अल्पावधीमध्येच फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने खूप प्रसिद्धी मिळवली. एक अभिनेत्री असण्यासोबतच ती एक व्यक्ती म्हणून देखील सर्वांच्या मनामध्ये बसली आहे.
बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवर खुलेपणाने बोलणे असो किंवा एखाद्या विषयावर मत व्यक्त करणे असो. श्रुती कधीच मागे पडत नाही. विशेष म्हणजे तिने आपल्या आजारपणाबद्दल देखील उघडपणे सर्व काही सांगितले आहे. श्रुतीने नुकतेच तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर करून याबद्दल माहिती दिली आहे.
या पोस्टमध्ये तिने आपल्या शरीरामध्ये होणारे बदल आणि त्या बदलांमुळे आपल्यावर होत असलेल्या परिणामांचा देखील यामध्ये उल्लेख केला आहे. श्रुतीने या आजाराला कसे सामोरे जायचे याबद्दल देखील माहिती दिली आहे.
गेल्या काही काळापासून श्रुती PCOS चा त्रास सहन करत आहे. यावर तिने एक पोस्ट देखील शेयर केले आहे. पोस्टला भलंमेठं कॅप्शनही देताना तिने एक व्हिडीओ देखील शेयर केला आहे. ज्यामध्ये आपल्याला व्यायाम करताना पाहायला मिळत आहे.
गेल्या काही काळापासून ती हामोन्समधील होत असलेल्या बदलांच्या तक्रारीला सामोरे जात आहे. फक्त महिलांनाच देखील यामुळे होणारे बद्दल जाणवू शकतात. श्रुती पुढे म्हणाली कि एक मी याकडे दुर्लक्ष करत यामुळे शरीरामध्ये होणारे नैसर्गिक बदल देखील स्वीकारले आहेत.
योग्य आहार आणि पुरेशी झोप त्याचबरोबर व्यायाम घेत श्रुती या बदलला सामोरे जात आहे. तिने हे देखील म्हंटले कि माझे शरीर सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये नाही पण माझे मन आहे. असं म्हणत तिनं शरीरात आनंदी हार्मोन्सच्या संचाराला वाव दिला आहे.
श्रुती हसनच्या या पोस्ट तिच्या बऱ्याच चाहत्यांनी तिचे कौतुक करत तिला सहानुभूती दिली आहे. आज अशा अनेक महिला आहेत ज्यांना अशा परिस्थितीमधून जावे लागत आहे. पण या महिलांनी याकडे आजार म्हणून न बघता त्याचा स्वीकार करून पुढे जावे असे देखील ती यावेळी म्हणाली.
View this post on Instagram