अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला बंगळूर पोलिसांनी ड्र ग्ज घेतल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. रविवारी रात्रीच्या पार्टीमध्ये त्याने ड्र ग्ज घेतल्याचे त्याच्यावर आरोप आहे. एम. जी. रोडवरील एका हॉटेलमध्ये पार्टी होत असलेयाचे पोलिसांना समजले होते.
माहिती मिळतात पोलीस तेथे पोहोचले आणि तेथील काही लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी काहीजणांची तपासणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यादरम्यान श्रद्धा कपूरच्या भावाची देखील यावेळी तपासणी करण्यात आली ज्यामध्ये तो देखील पॉझिटिव्ह आढळला.
त्याने आधीच ड्र ग्ज चं सेवन केले होते का हॉटेलमध्ये गेल्यानंतर केले होते याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास करत असताना बॉलीवूडचे ड्र ग्ज प्रकरण समोर आले होते.
यादरम्यान अनेक दिग्गज कलाकारांची नावे यावेळी समोर आली होती. त्यामध्ये श्रद्धा कपूरसह, रकुल प्रीत सिंग, दीपिका पदुकोण, सारा अली खान या अभिनेत्रींची देखील कसून चौकशी करण्यात आली होती. पण या प्रकरणामध्ये पुढे काहीच झाले नाही.
पण पुढे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सुशांतची माजी मॅनेजर जया साहा हिने चौकशी दरम्यान मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री श्रद्धा कपूरने ऑनलाइन सी बी डी ऑ ई ल मागवल्याची कबुली तिने यादरम्यान केली होती. श्रद्धासोबतचे तिचे व्हॉट्सॲप चॅट्स देखील पुढे आले होते.