‘बाथरूमध्ये त्याने माझ्या…’, या अभिनेत्रीनं अनेक दिवसांनंतर केली दिग्दर्शकाची पोलखोल, सांगितला कटू अनुभव…

By Viraltm Team

Published on:

टीव्ही वरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक शायनी दोशी पंड्या स्टोर मधील तिच्या भूमिकेमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. शाइनीने कमी काळामध्ये छोट्या पडद्यावर एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शाइनीने हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भंसाळीच्या सरस्वतीचंद्र या शोमध्ये टीव्ही इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. तसे तर संजय लीला भंसाळीसोबत काम करण्यासाठी स्टार्स अक्षरशः जीव तोड मेहनत करतात, पण जेव्हा शाइनीला हि संधी मिळाली तेव्हा तिच्यासाठी हे खूपच कठीण होते.

शाइनी दोशी स्वतःला खूप लकी समजते, तिला संजय लीला भंसाळीसोबत काम करण्याची संधी मिळाली, टीव्ही अभिनेत्रीने नुकतेच दिग्दर्शकासोबत काम करण्याचा आपला अनुभव शेयर करताना सांगितले कि, ती अनेकवेळा शो मध्येच सोडणार होती, कारण अभिनयाच्या कमीमुळे तिला बरेच काही ऐकावे लागत होते.

शाइनीने एका मुलाखतीमध्ये म्हंटले कि मी २०१२ मध्ये सरस्वतीचंद्रमध्ये काम केले. मला काहीच येत नव्हते. दिग्दर्शक माझ्यावर ओरडत होते. हे माझ्यासाठी खूपच लाजिरवाणे होते. मला थोडे विचित्र वाटायचे कि मी चुकीच्या ठिकाणी तर आले नाही ना, मी गुपचूप ऐकून घ्यायचे आणि बाथरूममध्ये जाऊन रडायचे. मग मी थोडी हिम्मत करायचे आणि परत सेटवर यायचे.

शाइनी दोशी पुढे म्हणाली कि प्रत्येक सीन करण्यापूर्वी मला भीती वाटायची. मला टेक्निकल नॉलेज नव्हते, हा एक ड्रीम प्रोजेक्ट होता. भंसाळी माझ्या लुक टेस्टसाठी तिथेच बसले होते, त्यांचे ओरडणे देखील तुम्हाला परफेक्ट बनवते. मी सेटवर इतके बोलणे खाऊन घ्यायचे कि मला १००० वेळा काम सोडण्याची इच्छा झाली. त्यावेळी प्रत्येक दिवशी आनंद आणि उत्साहाची कमी असायची. सकाळी उठल्यावर वाटायचे कि आज पुन्हा बोलणे खावे लागेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by shiny doshi (@shinydoshi15)

शाइनी दोशी सरस्वतीचंद्रमध्ये कुसुमच्या भूमिकेमध्ये दिसली होती. तिच्यासोबत गौतम रोढ़े आणि जेनिफर विंगेट देखील मुख्य भूमिकेमध्ये होते. शाइनी दररोज बोलणे खाऊन स्वतःला निगेटिव्ह फील करत होती. तिने प्रोडक्शन हाऊसला कॉल करून हे सर्व सांगितले होते, ती त्या भूमिकेसाठी फिट नव्हती. तिने म्हंटले कि, मला वाटले माझ्याकडून हे होत नाहीय, पण नंतर माझ्यावर विश्वास दाखवला गेला.

Leave a Comment