बॉलीवूड कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमुळे देखील नेहमी चर्चेमध्ये राहत असतात. बहुतेक बॉलीवूड कलाकार त्यांचे पर्सनल लाईफ स्वतःपर्यंत मर्यादीत ठेवतात. भारतातील कलाकारांचे पर्सनल लाईफ जाणून घेण्यासाठी पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी अनेक वेळा मोठ मोठ्या ऑफर्स दिल्याचे देखील समोर आले आहे.
२००७ मध्ये जेव्हा अभिनेत्री शिल्पा शेट्टी बिग ब्रदर या ब्रिटिश रियालिटी शोमध्ये विनर ठरली होती तेव्हा तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तितल्या प्रसारमाध्यमांनी खूप प्रयत्न केले होते. शिल्पाचा बॉयफ्रेंड अक्षय कुमारला देखील शिल्पाच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली होती.
अक्षय कुमारला यासाठी ३४ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. त्यांना हे जाणून घ्यायचे होते कि त्याचे शिल्पा शेट्टीसोबत अफेयर कधीपासून सुरु झाले. दोघांमध्ये संबंध कसे होते आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला. पण अक्षय कुमारने याबद्दल सांगण्यास नकार दिला.
तो म्हणाला कि, मी शिल्पाबद्दल या विषयावर कधीच कोणाला बोललो नाही आणि बोलणार देखील नाही. यासाठी मला कितीही मोठी रक्कम दिली तरी काही हरकत नाही. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीने कधीच याबद्दल बोलले नाही कि त्यांच्यामध्ये काहीच नव्हते.
बिग ब्रदर शोमध्ये स्वतः शिल्पाने देखील अक्षय बद्दल विधान केले होते. ती म्हणाली होती कि एकेकाळी ती आणि बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार एकमेकांना डेट करत होते. आता ती गोष्ट खूपच जुनी झाली आहे. अक्षय आणि मी दोघेहि आता आयुष्यामध्ये खूप पुढे आलो आहोत.
दरम्यान फक्त अक्षय कुमारला त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल सांगण्यासाठी मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली नव्हती तर शिल्पाला देखील मोठी ऑफर देण्यात आली होती. याबद्दल तिने नंतर खुलासा केला होता. ती देखील म्हणाली होती कि मी अक्षयसोबतच्या नात्याचा आदर करते त्यामुळे मी त्यावर कधीच काही बोलणार नाही.