धक्कादायक…! सिद्धू आणि केके नंतर आता ‘या’ दिग्गज गायकाचे नि’धन, वयाच्या २२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

By Viraltm Team

Published on:

दिल्ली येथी गायक-आणि गीतकार आणि विविध वाद्यांची माहिती असलेला गायक शैल सागर यांचे बुधवारी निधन झाले. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. अद्याप त्याच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार सागरने ‘इफ आय ट्राइड’ गाण्यापासून आपल्या करियरची सुरुवात केली होती. या गाण्यानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. शिवाय गेल्यावर्षी त्याचे तीन अल्बम रिलीज झाले होते. ज्यामध्ये बिफोर इट गोज, स्टिल आणि मिस्टर मोबाइल मॅन- लाइव याचा समावेश होता.

शैल सागरच मिस्टर मोबाइल मॅन-लाइव हे गाणे गुरुग्रामच्या द पियानो मॅन जॅज क्लबमध्ये ध्वनीमुद्रित करण्यात आले होते आणि त्याचे लाईव शुटींग करण्यात आले होते. सागरच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

याआधी सिद्धू मुसेवाला आणि प्रसिद्ध गायक केके यांच्या निधन झाल्यामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. आता हि पोकळी भरून निघत नाही तोवर आणखी एक दुखद बातमी समोर आली आहे. यामुळे सिनिसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

सागरच्या निधनानंतर सोशल मिडियावर शोक व्यक्त केला जात आहे. एका युजरने ट्विट करून हे लिहिले आहे कि संगीतकारांसोबत हे काय सुरु आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांनी शोक व्यक्त करत सागरला श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Comment