इतक्या करोडच्या लक्झरी घरामध्ये राहतो शाहरुख खान, पहा स्वप्नांचा महाल ‘मन्नत’चे आतले फोटो!

By Viraltm Team

Published on:

नुकताच बॉलीवूडचा बादशाह आणि किंग खान याचा वाढदिवस साजरा झाला. दोन दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा शाहरुख खान ५५ वर्षांचा झाला आहे. या निमित्ताने त्याने त्याच्या चाहत्यांना विनंती केली होती की कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता या वेळी मन्नतच्या बाहेर गर्दी करू नये, परंतु तरीही त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरा समोर जमले होते. किंग खान शाहरुखचे घर मन्नत, हे चाहत्यांमध्ये आकर्षणाचे केंद्र मानले जाते. त्याचे घर पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने येत असतात. अशा परिस्थितीत आम्ही आपल्याला मन्नतच्या आतील काही फोटो दाखवणार आहोत.
शाहरुखच्या या आलिशान बंगल्याचे नाव ‘मन्नत’ आहे. हा बंगला त्याची पत्नी गौरी खान हिने सजवला आहे. गौरी एक इंटिरियर डिझायनर सुद्धा आहे. गौरीने १९२० च्या शतकानुसार या घराची रचना केली आहे. पूर्वी हे घर विला विएना या नावाने ओळखले जात असे पण आता शाहरुख खान या बंगल्यात राहतो. शाहरुख खान कधी काळी ‘मन्नत’च्या जवळपासच राहायचा आणि शाहरुखला नेहमी हा बंगला खरेदी करण्याची इच्छा असायची. सनी देओलच्या ‘नरसिंह’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग ‘मन्नत’ मध्ये झाले होते. तसेच डेव्हिड धवनचा ‘शोला और शबनम’ या चित्रपटाचे शूटिंगही याच ठिकाणी झाले होते.
शाहरुख खानने आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात हा बंगला १३.३२ करोडमध्ये खरेदी केला होता. शाहरुख खानला खरं तर त्याचे नाव जन्नत ठेवायचे होते पण नंतर त्याचे नाव ‘मन्नत’ असे ठेवले गेले. मन्नतसंदर्भात शाहरुख खान म्हणतो,की “मला नेहमी वाटायचं की ती जागा मुजरा सेट किंवा गुंडांचा अड्डा आहे.” शाहरुखच्या या बंगल्याची रचना २० व्या शतकातील ग्रेड-३ हेरिटेज याप्रमाणे आहे, जी सर्व बाजूंनी उघडते.
मल्टिपल रूम्स, व्यायामशाळा आणि ग्रंथालय यासारख्या अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत. हा बंगला एकेकाळी ‘विला विएना’ म्हणून ओळखला जात होता आणि त्याचा मूळ मालक गुजरातचा पारशी किकू गांधी होता. मुंबईच्या कलाविश्वातील एक मोठे नाव असलेले किकू गांधी हे मुंबईतील ‘शिमल्ड आर्ट गॅलरी’ चे संस्थापक देखील होते. तो या बंगल्याचा मालक होता.
शाहरुखने हा बंगला त्यांच्याकडून विकत घेतला. मुंबई स्थित फकीह अँड असोसिएट्सने ‘मन्नत’चे बांधकाम केले आहे. बंगल्याच्या अंतर्गत भागासह स्टाईलिंग स्वत: गौरीने केले आहे. यासाठी तिला चार वर्षांहून अधिक काळ लागला असल्याचे तिचे म्हणणे आहे. ती प्रवास करायची, तिच्या आवडीची एकेक वस्तू विकत घ्यायची आणि आपल्या घराचा प्रत्येक कोपरा ना कोपरा संपूर्ण आनंदाने आणि जोमाने सजवायची, जेणेकरून सर्व काही परिपूर्ण दिसेल.लिव्हिंग स्पेस मध्ये जेवढी स्टाईलिंग करण्यात आली आहे तेवढीच स्टाईलिंग खाजगी रूममध्ये ठेवण्यात आली आहे. गौरीने येथे व्यावहारिक फर्निचर ठेवले आहेत. जवळच पुस्तके आणि बोर्ड गेम खेळण्याचे क्षेत्र देखील आहे. अनेक कौटुंबिक फोटो देखील येथे लावले गेले आहे. शाहरुख खानच्या या घराची म्हणजेच ‘मन्नतची’ किंमत सुमारे २०० कोटी रुपये आहे असे म्हंटले जाते. ‘मन्नत’ बाहेरून इतकं सुंदर आहे की मुंबईत येणारी प्रत्येक व्यक्ती इथे नक्कीच फोटो क्लिक करते. यामुळे पण शाहरुखच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी कायम बघत असते.
शाहरुख दिल्लीहून मुंबईला आला आणि त्याने टीव्हीवर ‘सर्कस’ आणि ‘फौजी’ सारख्या मालिकांमध्ये काम केले. नुकतेच एका चाहत्याने शाहरुखला ‘मन्नत’ च्या विक्रीबद्दल प्रश्न विचारला होता. ज्याला उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, लोकांसमोर डोके टेकूनच मन्नत मिळते. यावरून तुम्ही समजू शकता की मन्नत बद्दल शाहरुखच मत काय आहे.

Leave a Comment