शाहरुख खानच्या मुलीने विदेशी बॉयफ्रेंडसोबत केली एंगेजमेंट, फ्लॉन्ट केली एंगेजमेंट रिंग…

By Viraltm Team

Published on:

सना सईदला शाहरुख खानची ऑनस्क्रीन मुलगी म्हणून ओळखले जाते, कारण कुछ कुछ होता है तिने अंजलीच्या रुपामध्ये खूपच सुंदर भूमिका केली होती आणि वडील आणि मुलीची क्युट बॉन्डिंगवर दर्शकांनी भरभरून प्रेम केले होते. पण सना आता खूप मोठी झाली आहे.

इतकेच नाहीतर तर ती आता लग्न देखील करणार आहे. होय सनाने नवीन वर्षांच्या मुहूर्तावर तिच्या एंगेजमेंटची घोषणा केली आहे, यावरून स्पष्ट होते कि नवीन वर्षामध्ये ती लग्न करणार आहे. आता तुम्हाला हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली असेल कि तिचा होणारा नवरा कोण आहे.

सनाने सबा वॉर्नरसोबत एंगेजमेंट केली आहे ज्याला ती अनेक दिवसांपासून डेट करत होती. तो हॉलीवूडशी संबंधित आहे. हॉलीवूडमध्ये तो साउंड डिझायनर आहे. लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या साबाने गुडघ्यावर बसून सनाला प्रपोज केले आहे. सनाला त्याने अंगठी देखील घातली आहे ज्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आता हि बातमी समोर येताच सनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशी देखील चर्चा सुरु झाली आहे कि सना आता लवकरच विवाहबंधनात अडकू शकते.

एक बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री सनाला आज कोणाच्याही ओळखीची गरज नाही. तिने खूपच काम केले आहे पण तिला खरी ओळख कुछ कुछ होता है चित्रपटामध्ये अंजलीची भूमिका करून मिळाली. चित्रपटामध्ये तिने शाहरुखच्या मुलीची भूमिका केली होती.

यानंतर ती बादल, हर दिल जो प्यार करेगा आणि स्टूडेंट ऑफ द इयरमध्ये दिसली होती. सनाने अनेक टीव्ही सिरियल्समध्ये देखील काम केले आहे. २०१२ मध्ये ती बिग बॉसमध्ये आली होती त्यांतर ती खूपच चर्चेमध्ये आली. सध्या ती टीव्हीवर पाहायला मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sana Saeed (@sanaofficial)

Leave a Comment