शाहरुख खानचा सोशल मिडियावर जबरदस्त चाहता वर्ग आहे. चाहते त्याची एक झलक मिळवण्यासाठी नेहमी आतुर असतात. तर किंग खानदेखील आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी मागेपुढे बघत नाही. नुकतेच अभिनेता एयरपोर्टवर स्पॉट झाला. त्याच्यासोबत त्याची दोन्ही मुले आर्यन खान आणि अबराम देखील होते.
एयरपोर्टवर एका चाहत्याने शाहरुखसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आर्यन आपल्या वडिलांना प्रोटेक्ट करताना दिसला. शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चाहते आर्यनच्या या वर्तवणूकीबद्दल त्याचे कौतुक करत आहेत.
शाहरुख खान ब्लू पँट आणि ब्लॅक जॅकेट घातलेला पाहायला मिळाला. आर्यन देखील कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसला. शाहरुखसोबत त्याचा लहान मुलगा अबराम देखील होता. यादरम्यान शाहरुख आपल्या मुलांसोबत चालला होता तेव्हा एक चाहता सेल्फी घेण्यासाठी त्याच्या जवळ आला आणि त्याचा हात पकडू लागला.
शाहरुख थोडा मागे हटला आणि तेव्हा गार्ड समोर आले. तर आर्यनने देखील आपल्या वडिलांना सपोर्ट करण्यासाठी आपला हात पुढे केला. यानंतर शाहरुख आपल्या गाडीकडे निघून गेला. शाहरुख सध्या त्याच्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. माहितीनुसार शाहरुख गेल्या काही दिवसांपासून राजकुमार हिरानीसोबत लंडनमध्ये डंकी चित्रपटाचे शुटींग करत होता.
डंकीमध्ये शाहरुखसोबत तापसी पन्नूदेखील पाहायला मिळणार आहे. शाहरुख पठाण चित्रपटाच्या देखील तयारी मध्ये आहे. चित्रपटामध्ये त्याच्यासोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. जवानमध्ये शाहरुख आणि साउथ फिल्म इंडस्ट्रीमधी अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेमध्ये आहे.
View this post on Instagram
चाहते शाहरुखच्या कमबॅकबद्दल खूपच उत्सुक आहेत. २०१८ मध्ये जीरो चित्रपटामध्ये शाहरुख शेवटचा पाहायला मिळाला होता. शाहरुख आणि आलियाच्या प्रोडक्शन हाउसने मिळून डॉर्लिंग चित्रपट प्रोड्यूस केला आहे. डॉर्लिंग चित्रपटाला दर्शकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरुखने डॉर्लिंगच्या रिलीज दरम्यान ट्वीट करून लिहिले होते कि चित्रपटाबद्दल मी खूपच नर्वस आहे. इटर्नल सनसाइन प्रोडक्शनसोबत हा माझा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाच्या रिलीजसाठी मी खूपच जास्त उत्सुक आहे.