कास्टिंग काउचबद्दल ‘या’ अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली; ‘स्ट्रगल करत असलेल्या अभिनेत्रींना…

By Viraltm Team

Published on:

वर्षाच्या शेवटच्या दिवसात मारीच या क्राईम थ्रिलर मध्ये तुषार कपूर आणि नसरुद्दिन शाह सोबत दिसणार आहेत, सिरत कपूर पुन्हा एकदा बॉलीवूड मध्ये सक्रीय झाली आहे. अलीकडेच तिने तेलुगु निर्माता दिल राजू चा फिमेल लीड असणारा चित्रपट साईन केला आहे.

२०१४ मध्ये दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या ‘जिद’ मध्ये एक लहान पण महत्वाची भूमिका साकारल्या नंतर सिरत २०२२ मध्ये बॉलीवूड मध्ये परतली होती. अग्निहोत्री च्या चित्रपटानंतर ती साउथ ला गेली होती आणि तिथे तेलुगु चित्रपटामध्ये काम करत होती. तिचे जवळपास आठ तेलुगु चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि ती साउथ मधील एक प्रसिद्ध व्यक्ती बनली आहे.

सिरत कपूर ला तिच्या दीर्घ कारकिर्दीत विविध अनुभव आले आहेत. नुकत्याच झालेल्या एका संवादात तिने चित्रपटामध्ये कास्टिंग काऊच असण्याची शक्यताही नाकारली नाही. सिरत कपूर ने सांगितले कि इंडस्ट्री मध्ये कास्टिंग काऊच चे अस्तित्व नाकारता येत नाही.

तथापि तिने स्पष्टपणे सांगितले कि माझे म्हणणे आहे कि याला नियंत्रित करणे त्याच्याच हातात आहे, ज्याला अशा ऑफर मिळतात. सिरत ने सांगितले कि अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः ला आणि परिस्थितीला कसे सामोरे जाता यावर सर्वकाही अवलंबून असते. चित्रपटांमध्ये स्ट्रगल करणाऱ्या मुलींनी जागरूक राहायला हवे आणि कोणत्याही परिस्थितीत नतमस्तक होऊ नका. तिने सांगितले कि प्रत्येक व्यक्तीने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.

चित्रपट इंडस्ट्री मध्ये नेपोटीजम आणि बाहेरून येणारे कलाकार पुरुष अथवा महिला कलाकारांमधील भेदभावांच्या बाबीवर ती म्हणते कि मला या प्रकरणात फारसे काही कळत नाही कारण मी असल्या गोष्टीवर लक्ष देत नाही. माझे लक्ष कायम स्वतः ला आणि माझ्या अभिनयाला सुधारण्यावर असते.

दुसरे काय म्हणतात आणि काय करतात त्याविषयी विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा, मी स्वतः अभिनेत्रीच्या रुपात स्वतः ला कसे अजून सुधारणा करता येईल, यावर जास्त लक्ष केंद्रित करते. ती म्हणाली कि भेदभावासारख्या गोष्टी मानवी जीवनाचा एक भाग आहेत. चित्रपटांमध्ये देखील असे होते कि, अनेक वेळा त्यांच्या जीवनावरही वाईट परिणाम होतो. परंतु कुठेतरी थांबण्यापेक्षा चालत राहणे बरे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Seerat Kapoor (@iamseeratkapoor)

Leave a Comment