सतीश कौशिकच्या पोस्टयमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा, जाणून घ्या कोणत्या कारणामुळे झाला अभिनेत्याचा मृत्यू…

By Viraltm Team

Published on:

सतीश कौशिक यांच्या पोस्टतमॉर्टम रिपोर्ट आला आहे. दिल्ली पोलिसांनुअर कोणतीही संशयास्पद माहिती समोर आलेली नाही. पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक तपासामध्ये हि माहिती समोर आली आहे कि हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचा मृत्यू झाला. व्हिसेरा जतन करण्यात आला असून, पुढील तपास करण्यात येणार आहे. यावरून सतीश कौशिक यांनी मृत्यूपूर्वी काय खाल्लं आणि प्यायलं हे समजणार आहे.
सतीश कौशिक यांची प्रकृती जेव्हा बिघडली तेव्हा ते दिल्लीमध्ये होते. प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना दिल्लीजवळील गुरूग्रामच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.पोलिसांनी सांगितले कि सतीश कौशिक यांच्या मृत्यूची बातमी त्यांना हॉस्पिटलकडून मिळाली. सतीश कौशिक यांच्यासोबत असलेल्या लोकांनी त्यांना संपर्क केला नाही. पोलीस आता या प्रकरणामध्ये प्रत्येक बाजूने तपास करत आहेत.
सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये दिल्लीची साउथ वेस्ट पोलीस तपास करत आहे. बिजवासन यांच्या फार्म हाऊसवर होळी खेळल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास सतीश कौशिक यांची प्रकृती खालावली. ते फार्म हाऊसवर कधी आले, पूर्ण दिवस काय केले सध्या कोणतीच माहिती पोलिसांकडे नाही, कारण पोलिसांना कॉल केला गेला नाही.
सतीश कौशिक यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी पोलिसांना कोणतीची माहिती देण्यात आली नाही. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आतमध्ये जाण्यापूर्वी सतीश कौशिक यांचा मृत्यू झाला होता. यामुळे हॉस्पिटलकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांना दिल्ली पोलिसांनी पोस्टमॉर्टम दिल्लीच्या हरिनगरमध्ये दीन दयाल हॉस्पिटलमध्ये करण्याचे ठरवले. जे लोक सतीश कौशिक यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ते पोलिसांच्या संपर्कामध्ये आहेत. पोलीस तपास करत आहेत.

Leave a Comment