सर्वांना हसवणारे सतीश कौशिक आता आपल्यामध्ये राहिले नाहीत आणि गुरुवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी वंशिका खूपच चर्चेमध्ये आली आहे जी अवघ्या ११ वर्षाची आहे.
सतीश कौशिक नेहमी आपल्या लाडक्या मुलीचे व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर करत असत. सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका देखील आपल्या वडिलांप्रमाणे खोडकर स्वभावाची आणि सर्वाना हसवणारी आहे आणि सतीश कौशिक यांनी सांगितले होये कि या वयामध्ये वडील बनणे किती आव्हानात्मक होते.सतीश कौशिक ज्या वयामध्ये वडील बनले होते त्या वयामध्ये लोक आजोबा बनतात. सतीश कौशिकने मिडियासोबत बोलताना एकदा म्हंटले होते कि ५० व्या वर्षी वडील बनणे खूपच आव्हानात्मक होते. १९९४ मध्ये शशी कौशिक आणि सतीश कौशिक यांना एक मुलगा झाला होता ज्याचा १९९६ मध्ये मृत्यू झाला. सतीश कौशीच्या मुलाच्या मृत्यूनंतर देखील त्यांनी पालक बनण्याचा निर्णय घेतला.सतीश कौशिक यांच्या घरी २०१२ मध्ये एका मुलीचा जन्म झाला त्यावेळी ते ५६ वर्षाचे होते आणि मुलीचे नाव वंशिका ठेवले जी सरोगसी प्रक्रियेतून झाली होती. मुलीच्या जन्मानंतर त्यांचे आयुष्य बदलून गेले आणि ते आपला बहुतेक वेळ आपल्या मुलीसोबत घालवू लागले. पण एका एकी सतीश कौशिक यांच्या जाण्याने त्याची लहान मुलगी वंशिका खूपच खचली आहे आणि तिला आपल्या वडिलांची उणीव खूप भासू लागली आहे.