बॉलीवूड आणि साऊथ सिनेसृष्ट्रीतील बरेच स्टार किड्स सिनेइंडस्ट्रीमध्ये सध्या काम करताना पाहायला मिळत आहेत तर काही स्टार किड्स डेब्यू करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्याचबरोबर काही स्टार किड्स असे देखील आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये जरासुद्धा रस नाही ते दुसऱ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत.
अशीच एक स्टार कीड आहे साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता आणि सत्यराज यांची लेक दिव्या सत्यराज. बाहुबली चित्रपटामध्ये कटप्पाची भूमिका साकारल्यानंतर सत्यराज यांना जगभरामध्ये लोकप्रियता मिळाली. पण त्यांची मुलगी दिव्या हिला सिनेइंडस्ट्रीमध्ये फारसा रस नाही.
दिव्या सत्यराज न्युट्रीशनिस्ट आहे. दिव्या सत्यराज आपल्या वडिलांप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत नसली तरी ती सौंदर्याच्या बाबतीत दिग्गज अभिनेत्रींना देखील टक्कर देते. दिव्याने अभिनय क्षेत्र न निवडता आयुष्यामध्ये वेगळे काहीतरी करायचे ठरवले. दिव्या तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेमध्ये असते. इतकेच नाही तर समाजकल्याणाच्या कामामध्ये ती हिरीरीने सहभाग घेते.
दिव्या गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असते. विशेष म्हणजे ती विदेशामध्ये देखील आपल्या कामाने लोकांची मदत करत आहे. दिव्याला या कामासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले आहे.दिव्या एक एनजीओ
View this post on Instagram
देखील चालवते. ज्याद्वारे ती गरजू लोकांची मदत करत असते. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या सामाजिक कामाबद्ल तिला पत्र लिहून तीचे कौतुक केले आहे. दिव्या सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय असते. इंस्टाग्रामवर तिचे असंख्य चाहते आहेत. दिव्याने शेयर केलेले फोटो तुफान व्हायरल होत असतात.