‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करतेय सचिन तेंडुलकरची लेक सारा, फोटो सोशल मिडियावर व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सारा प्रसिद्धी झोतापासून दूर असली तरी ती सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहते. अनेक वेळा ती आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करते. तिच्या फोटो आणि व्हिडीओ वर चाहते भरभरून प्रतिसाद देतात. पण सारा आली खान परत एकदा चर्चेमध्ये आली आहे. तिचे काही फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे चाहते देखील हैराण झाले आहेत.

सारा तेंडुलकर सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. शिक्षण घेता घेता ती मॉडेलिंगमध्ये देखील आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. साराने याआधी देखील अनेक ब्रँडसाठी फोटोशूट देखील केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी तिचे नाव भारतीय क्रिकेट संघामधील खेळाडू शुभमन गिलसोबत देखील जोडले गेले होते.

शुभमन आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या पण आता काही वेगळेच फोटो समोर आले आहेत. यावेळी सारा शुभमनसोबत नाही तर एका दुसऱ्याच व्यक्तीसोबत पाहायला मिळत आहे. दोघांचे काही फोटो सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.

फोटोमध्ये जान्हवी कपूरचा एक्स बॉयफ्रेंड सारासोबत पाहायला मिळत आहे. सारा तेंडुलकरचे व्हायरल होत असलेले फोटो पाहून फोटोमध्ये दिसणारा मिस्ट्री बॉय कोण आहे याची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये होत आहे. पण हा मिस्ट्री बॉय ओरहान अवत्रमणी आहे.

ओरहानची बॉलीवूडमधील अनेक सेलेब्स किड्ससोबत खास ओळख आहे. यापूर्वी त्याचे काही फोटो अजय देवगनची मुलगी न्यासा देवगन, जान्हवी कपूर यांच्यासोबत देखील व्हायरल झाले आहेत. ओरहान आणि जान्हवी कपूर एकमेकांना डेट करत आहेत अशा देखील अफवा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. आता हे फोटो पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जात आहे कि दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar.fp)

Leave a Comment