दोन वर्षापूर्वी १४ जून २०२० रोजी दुपारी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी समोर आली होती, तेव्हा संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सुशांतने बॉलीवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
मात्र सुशांतने घेतलेल्या अचानक एग्झीटमुळे त्याच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले होते. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आज दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे त्याच्या असंख्य चाहत्यांनी त्याच्याबद्दल सोशल मिडियावर पोस्ट शेयर केल्या आहेत.
अभिनेत्री सारा अली खानने देखील सुशांतसाठी खास पोस्ट लिहिली आहे. साराने शेयर केलेली हि पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. साराने केदारनाथ चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूतने देखील काम केले होते.
साराने लिहिले आहे कि, पहिल्यांदा कॅमेऱ्याला सामोरं जाण्यापासून ते तुझ्या दुर्बिणीतून पहिल्यांदा गुरू आणि चंद्र पाहण्यापर्यंत- तुझ्यामुळे मला अनेक गोष्टी शिकायला अनुभवायला मिळाल्या. आज पौर्णिमा आहे आणि आजच्या रात्री मी जेव्हा आकाशाकडे पाहीन तेव्हा तू तुझ्या आवडत्या ताऱ्यांसोबत आणि नक्षत्रांसोबत नेहमी चमकत असशील कायमचे.
View this post on Instagram
सुशांत आणि साराचा केदारनाथ चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या शुटींग दरम्यान सारा आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत अशा देखील चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. सुशांत मृत्यूप्रकरणी ड्र ग्ज अँ ग’लच्या तपासामध्ये साराची देखील चौकशी करण्यात आली होती.
केदारनाथ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघे वेगळे झाले असा देखील कयास लावण्यात आला होता. विशेष म्हणजे सारा आणि सुशांत व्हेकेशनला थायलँडला एकत्र देखील गेले होते अशी माहिती सुशांतचा सहाय्यक साबिर अहमद याने दिली होती. मात्र सुशांत आणि साराचे रिलेशन जास्त काळ टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले.