फिल्ममेकर करण जौहरचा चॅट शो कॉफी विथ करणचा सातवा सीजन पहिल्या एपिसोडपासूनच ट्रेंडमध्ये आहे. शोमध्ये बॉलीवूड स्टार्स उघडपणे आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल खुलासे करत आहेत. नुकतेच या शोचा दुसरा एपिसोड रिलीज झाला आहे.

दुसऱ्या एपिसोडमध्ये बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूरने हजेरी लावली होती. या शोमध्ये सारा आणि जान्हवीने करण जौहरच्या समोर अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. दोन्ही अभिनेत्रींनी डेटिंगच्या चर्चांवर उघडपणे वक्तव्य केले.

शोमध्ये करणने या दोन्ही अभिनेत्रींची पोलखोल देखील केली. त्याने सांगितले कि सारा आणि जान्हवी दोन सख्ख्या भावांनाच डेट करत होत्या. शो दरम्यान करण म्हणाला कि, जर कोरोनाच्या अगोदरच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर मला माहित नाही कि तुम्हा दोघांची दोस्ती कशी आहे.

मला चांगलेच आठवते कि एके काळी तुम्ही दोघी दोन सख्ख्या भावांना डेट करत होता. हि खूप जुनी गोष्ट आहे. पण तुम्ही दोघींनी त्या भावांना डेट केले आहे आणि एक कॉमन गोष्ट म्हणजे सर्वजण एकाच बिल्डींग मध्ये राहत होता. हे ऐकताच सारा आणि जान्हवी हसू लागतात.

असे म्हंटले जाते कि सारा आणि जान्हवी वीर आणि शिखर पहाड़िया या दोघांना डेट करत होत्या. तथापि दोघींचे रिलेशनशिप जास्त दिवस टिकले नाही. वीर आणि शिखर एका मोठ्या राजकारणी कुटुंबामधून होते. त्यांचे आजोबा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आहेत आणि त्यांचे वडील संजय पहाड़िया हे मुंबईमधील एक मोठे व्यावसायिक आहेत.

वीरचे वय आता २८ वर्षे आहे आणि तो शिकण्यासाठी दुबईला गेला आहे आणि शिखर आता २३ वर्षांचा झाला आहे आणि तो लंडनमध्ये शिकत आहे. दोन्ही भावांची एक एंटरटेनमेंट आणि गेमिंग कंपनी आहे जी त्यांनी २०१८ मध्ये सुरु केली होती. आता दोघांचे रिलेशन या ग्लॅमर गर्ल्स सोबत नाही. पण जरा विचार करा कि सारा आणि जान्हवीचे दोन्ही भावांसोबत लग्न झाले असते तर दोघी सख्या जावा-जावा असत्या.