शिवरात्रीला शिवभक्तीत लीन झाली सारा अली खान, पाहून भडकले लोक; सारा अली खान ट्रोल का झाली?

By Viraltm Team

Published on:

महाशिवरात्रीचा पवित्र सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. संपूर्ण देश शिवभक्तीमध्ये लीन झालेला पाहायला मिळाला. सामन्यांपासून ते सेलेब्रिटी पर्यंत लोक शिवभक्तीमध्ये महाशिवरात्रीला लीन झालेले पाहायला मिळाले.

बॉलीवुड सेलेब्सनी देखील हा पवित्र सन उत्साहामध्ये साजरा केला आणि सोशल मिडियावर पोस्ट शेयर करून चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देखील दिल्या. बॉलीवूडची प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री सारा अली खानने देखील आपल्या चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

सारा अली खान महादेवाची मोठी भक्त आहे. महादेवावर तिची मोठी आस्था आहे. मुस्लीम असूनदेखील सारा अली खानला हिंदू धर्मावर श्रद्धा आहे. केदारनाथ, ओमकारेश्वर, भीमाशंकर आणि महाकालेश्वर सारख्या ज्योतिर्लिंगचे दर्शन देखील तिने केले आहे आणि नेहमी ती मंदिरांमध्ये पाहायला मिळते.

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सारा अली खानचा हिंदू अवतार पाहायला मिळाला. तिच्या माथ्यावर चंदन लागलेले दिसत आहे आणि तिच्या गळ्यामध्ये चुनरी देखील आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अभिनेत्रीने अनेक फोटो महाशिवरात्रीच्या प्रसंगी शेयर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.

चाहते साराचे खूप कौतुक करत आहेत आणि सोशल मिडियावर तिचे कौतुक करत तिला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत आहेत. तर काही लोक तिला ट्रोल देखील करत आहेत. मुस्लीम असल्यामुळे सारा अली खानला काही लोकांनी ट्रोल केले. मुस्लीम असून सारा द्वारे महादेवाची पूजा केलेली लोकांना आवडली नाही आणि यामुळे तिला ट्रोल केले.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सारा अली खानने इंस्टाग्राम अकाऊंटवरून सात फोटो शेयर केले आहेत. फोटो ओमकारेश्वर, महाकालेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर ज्योतिर्लिंगचे आहेत. या फोटोंना आतापर्यंत १३ लाख २० हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे आणि यावर खूप कमेंट्स देखील आल्या आहेत.

फोटो शेयर करण्यासोबत साराने कॅप्शनमध्य, “जय भोलेनाथ. #महाशिवरात्री #हरहरमहादेव” असे लिहिले आहे. एका युजरने साराच्या पोस्टवर कमेंट करत माशाअल्लाह लिहिले आहे. माझ्या देशाला याच्या एकटेसाठी प्रेम करते. सर्व हिंदू बंधू आणि भगिनींना हर हर महादेव.

एका युजरने साराच्या फोटोवर कमेंट करत तिला प्रश्न विचारला आहे. युजरने लिहिले आहे कि तू मुस्लीम असून देखील मंदिरामध्ये का जातेस. एकाने लिहिले आहे कि थोडे इस्लाम वाच. मी तुला अनफॉलो करत आहे. तर एका युजरने कमेंटमध्ये सारा अली खानला आपले नाव बदलण्यास सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

साराने हिंदी चित्रपटामध्ये केदारनाथ चित्रपटामधून डेब्यू केला होता. या चित्रपटामध्ये तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत काम केले होते. डिसेंबर २०१८ मध्ये आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. यानंतर साराने मागे वळून पाहिले नाही.

Leave a Comment