सैफ अली खानची मुलगी सारा अली खान नुकतेच करण जौहरचा चॅट शोच्या ७ व्या सिझनमध्ये जान्हवी कपूरसोबत आली होती. यादरम्यान जान्हवी आणि साराने एकमेकांचे अनेक सिक्रेट उघड केले. पण आता सारा अली खानने असे फोटोशूट केले आहे कि पाहता पाहता ती चांगलीच चर्चेमध्ये आली आहे. खास गोष्ट हि आहे कि फोटोशूटमध्ये सारा पांढऱ्या कलरच्या शर्टचे बटन खोलून डायमंड जडलेली ब्रा कॅमेऱ्यासमोर फ्लॉंट करताना दिसली.

या फोटोमध्ये सारा अली खान डायमंडने जडलेली ब्रा घातलेली दिसली. अभिनेत्रीने या ब्रावर पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे ज्याचे वरचे बटन उघडले आहे. तर अभिनेत्रीने ब्राच्या खाली एक पांढरा कपडा लपेटून घेतला आहे. अभिनेत्रीने हे फोटो शेयर करताच ते पाहता पाहता व्हायरल झाले आहेत.

सारा आली खानने जसे हे फोटो शेयर केले तसे सोशल मिडियावर चांगली खळबळ उडाली आहे. हे फोटो शेयर करून अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, माझा पायाच्या खाली तर नाही पण मला डायमंड मिळाला आहे. वास्तविक साराने हे फोटोशूट Elle मॅगजीनसाठी केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्री आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड लुकमध्ये पाहायला मिळाली आहे. साराने जसे हे फोटो सोशल मिडियावर शेयर केले तसे चाहते तिच्या या फोटोमध्ये हार्टचे इमोजी कमेंट करत आपल्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

कॉफी विथ करण सीझन 7′ मध्ये सारा अली खानने उघड केले होते कि तिला विजय देवराकोंडा खूप आवडतो. अभिनेत्रीने हा खुलासा केल्यानंतर विजय देवरकोंडाने देखील यावर उत्तर दिले आहे. त्याने इंस्टा स्टोरी शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, तू मला देवराकोंडा म्हटले तसे मला खूप छान वाटले. खूपच क्युट होते. तुम्हाला माझे हग.