फिल्मी कलाकारांबद्दल चाहत्यांची क्रेज काही कमी नाही. कोणी आपल्या फेवरेट अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या नावावर मंदिर बनवतो तर कोणी आपल्या शरीरावर टॅटू बनवून घेतो. अनेक चाहत्यांनी तर आपल्या मुलांची नवे फेवरेट अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या नावावर ठेवली आहेत.
पण असे अनेकप्रकारचे किस्से समोर येतात ज्यासमोर वेडेपणा हा शब्द देखील कमी पडतो. असाच एक किस्सा सज्नय दत्तच्या एक महिला चाहतीसोबत जोडला आहे. जिने मरण्याच्या अगोदर आपली संपूर्ण संपत्ती संजू बाबाच्या नावावर केली होती.
हि गोष्ट जास्त जुनी नाही. २०१८ संजय दत्तला पोलिसांचा एक फोन आला आणि सांगितले गेले कि निशा पाटील नावाची एक चाहती आहे. तिचा दोन आठवड्यापूर्वी मृत्यू झाला आहे. सुरुवातीला संजय दत्तला काहीच समजले नाही कि पोलिसांनी त्याला का फोन केला आहे. पण त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने जे सांगितले त्यामुळे संजय दत्तच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. पोलिसांनी सांगितले कि निशा पाटीलने मरण्यापूर्वी आपली संपूर्ण संपत्ती तुमच्या नावावर केली आहे.
पोलीस पुढे म्हणाले कि महिला चाहतीने अनेकवेळा बँकेला पत्रे लिहिली आणि विनंती केली कि तिच्या खात्यामध्ये जे काही आहे, तिची जी काही समाप्ती आहे ती सर्व संजय दत्तच्या नावावर करावी. असे म्हंटले जाते कि निशा पाटीलने संजय दत्तच्या नावावर तब्बल ७२ करोड रुपयांची संपत्ती केली आहे.
निशाचे प्रेम आणि तिच्या इच्छेचा संजय दत्तने सन्मान केला. पण यासोबत त्याने पोलीस अधिकारी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना वीनंत केली कि निशा पाटीलचा सन्मान आणि तिची संपत्ती त्याला नको आहे. तिची संपत्ती तिच्या कुटुंबाला परत करावी. बँकेच्या म्हणण्यानुसार निशाने ‘KGF 2’ अभिनेत्याला पाली हिलमधील तिच्या सर्व बँक खात्यांसाठी नामांकित केले होते.
माहितीनुसार संजय दत्तने एक निवेदन जारी करून लिहिले की, चाहते अनेकवेळा त्यांच्या मुलांची नावे आमच्या नावावर ठेवतात. ते आमच्या एका झलकसाठी आमचा रस्त्यावर पाठलाग करतात. इतकेच नाही तर आम्हाला गिफ्ट देखील देतात. पण या घटनेने मला चकित केले. मला त्यांच्या संपत्तीवर कोणताही दावा करायचा नाही. मी निशा पाटीलला ओळखत नाही आणि याबद्दल बोलताना मी खूप इमोशनल झालो आहे.
संजय दत्तच्या वकिलांनी नंतर सांगितले कि आम्ही बँक आणि निशा पाटीलच्या कुटुंबीयांना कळवले आहे की संजय दत्त या मालमत्तेवर कोणताही दावा करणार नाही. मृतांच्या मौल्यवान वस्तू त्यांच्या कुटुंबीयांना परत मिळण्यासाठी आम्ही कायदेशीर कारवाई करू. संजय दत्त प्रशांत नीलच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘KGF: Chapter 2’ मध्ये शेवटचा पाहायला मिळाला होता. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटामध्ये यश मुख्य भूमिकेमध्ये होता. तर रवीना टंडन, श्रीनिधि शेट्टी, आणि प्रकाश राज सपोर्टिंग भूमिकेमध्ये होते. संजय दत्त आता द गुड महाराजा चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.