बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. हेच कारण आहे कि तो बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. नुकतेच संजय दत्त साउथचा सुपरहिट चित्रपट KGF २ मध्ये खतरनाक व्हिलनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता.
या भूमिकेमध्ये संजय दत्तला खूपच जास्त लोकप्रियता मिळाली. इतकेच नाही तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. संजय दत्त आपल्या प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमुळे देखील खूपच चर्चित राहिला. तथापि आज आपण संजय दत्तची तिसरी पत्नी मान्यता दत्तबद्दल जाणून घेणार आहोत. मान्यता दत्त देखील बॉलीवूडमधील पॉपुलर अभिनेत्री आहे. मान्यता दत्त दुबईमध्ये राहते. मान्यताचा जन्म दुबईच्या एका मुस्लीम कुटुंबामध्ये झाला.
इतकेच नाही तर ती लहानाची मोठी दुबईमध्येच झाली. तिचे नाव दिलनवाज शेख होते. तथापि बॉलीवूडमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव बदलून सारा खान ठेवले होते. मान्यता दत्तला फिल्म इंडस्ट्रीमध्ये सारा खान नावाने खूपच लोकप्रिया मिळाली.
मान्यता दत्तला सर्वात जास्त प्रसिद्धी प्रकाश झाच्या गंगाजल चित्रपटामधून मिळाली होती. या चित्रपटामध्ये तिने आइटम सॉन्ग केले होते. मान्यता दत्त दुबईहून बॉलीवूडमध्ये एक लोकप्रिय अभिनेत्री बनण्यासाठी आली होती. तथापि तिला मोठे चित्रपट मिळू शकले नाहीत. यामुळे तिला बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावे लागले. नंतर संजय दत्तने मान्यताच्या चित्रपटांचे राइट्स खरेदी केले होते.
गंगाजल चित्रपटामध्ये आइटम सॉन्ग केल्यानंतर मान्यताने आपले नाव बदलू मान्यता ठेवले होते. मान्यता संजय दत्तची तिसरी पत्नी आहे तर संजय दत्त मान्यताचा दुसरा पती आहे. मान्यताचे पहिले लग्न मेराज उर रहमानसोबत झाले होते. दोघांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाल्यानंतर मेराज सोबत घटस्फोट घेऊन मान्यताने संजय दत्त सोबत लग्न केले.
बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणारी मान्यताने जेव्हा संजय दत्त सोबत लग्न केले तेव्हा तिचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. मान्यता दत्त आता एक प्रोड्यूसर म्हणून काम करते. इतकेच नाही तर मान्यताने अनेक चित्रपट प्रोड्यूस केले आहेत.