बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत दिल बेचारा चित्रपटामध्ये दिसलेली अभिनेत्री संजना सांघीच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते. या चित्रपटामधून संजनाला बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळाली आणि सुशांत सिंह राजपूतसोबतची तिची जोडी दर्शकांना खूपच आवडली.

तथापि सुशांतचा हा शेवटचा चित्रपट होता. पण खूपच कमी लोकांना माहिती आहे कि संजना दिल बेचाराच्या आधी अभिनेता रणबीर कपूरसोबत देखील दिसली होती. तिने ११ वर्षापूर्वी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती पण दिल बेचारा चित्रपटामधून तिला खरी ओळख मिळाली. नुकतेच संजनाने रणबीर कपूरसोबत काम करण्याचा आपला अनुभव शेयर केला आणि तिने रॉकस्टार संबंधी अनेक खास गोष्टी देखील सांगितल्या.

संजनाने वयाच्या १३ व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती. यादरम्यान तिने रणबीर कपूरसोबत काम केले. संजनाने म्हंटले कि जेव्हा मी १३ वर्षांची होते तेव्हा रॉकस्टारमध्ये मॅडीची भूमिका केली आणि रणबीर असा पहिला अभिनेता आहे ज्याच्यासोबत मी चित्रपटाच्या सेटवर पाऊल ठेवले.

तिने रणबीर कपूरबद्दल सांगताना म्हंटले कि चित्रपटाच्या सेटवर तो माझा हात पकडत होता आणि यामुळे मला फिल्म मेकिंगशी प्रेम झाले. रणबीर आणि इम्तियाज अलीने मला म्हंटले कि मी कधीच अॅक्टिंग सोडू नये. त्यांनी मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली आणि हे सर्व मी माझ्या आईला सांगितले.

नरगिस फाखरी आणि रणबीर कपूर स्टारर चित्रपट रॉकस्टार बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. चित्रपटामध्ये संजना नरगिस फाखरीच्या लहान बहिणीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. संजनाने सांगितले कि तिला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी तेव्हा मिळाली जेव्हा कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबड़ाने तिला स्कूलमध्ये एक परफॉर्मेंस करताना बघितले होते. यानंतर तिला रॉकस्टार चित्रपटासाठी ऑफर देण्यात आली.

अभिनेत्री संजनाने आपल्या फिल्मी करियरमध्ये हिंदी मीडियम, फुकरे रिटर्ंस सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच ती अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत राष्ट्र कवच ओममध्ये दिसली होती. माहितीनुसार ती तापसी पन्नूच्या धक धक मध्ये आहे ज्यामध्ये ती दीया मिर्जा, रत्ना पाठक, फातिमा सना शेख सर्ख्य्ता अभिनेत्रींसोबत दिसणार आहे.