बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये मोठे यश मिळवण्यासाठी एक कलाकार म्हणून कोणत्याही व्यक्तीला खूप मेहनत करावी लागते. तथापि अनेक कलाकार असे देखील असतात जे आपल्या पहिल्याच चित्रपटामधून सुपरस्टार बनतात. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी तिच्या पहिल्याच चित्रपटामधून खूपच फेमस झाली होती. इतकेच नाही तर सलमान खान सारख्या अभिनेत्यासोबत तिला काम करण्याची संधी मिळाली आणि या जोडीला खूपच पसंद केले गेले. तथापि गेल्या काही वर्षांपासून गुमनामी आयुष्य जगणारी हे अभिनेत्री सध्या कुठे आहे.

वास्तविक आपण सनम बेवफामध्ये सुपरस्टार सलमान खानसोबत दिसलेली अभिनेत्री नवोदिता शर्माबद्दल बोलत आहोत. चला तर जाणून घेऊया नवोदिता शर्मा कुठे आहे. सनम बेवफा चित्रपटामध्ये सलमान खान आणि नवोदिता शर्माला खूप पसंद केले गेले.

चित्रपटामध्ये नवोदिता शर्माचे नाव चांदणी होते आणि याच नावाने ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झाली. आज देखील चाहते तिला नवोदिता शर्मा नाही तर चांदणी म्हणूनच ओळखतात. सनम बेवफा चित्रपटानंतर नवोदिता शर्माने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तथापि तिला सर्वात मोठी सफलता मिळू शकली नाही.

नवोदिता शर्माने तिच्या करीयरमध्ये उम्र ५५ की दिल बचपन का, जान से प्यारा, ए लव स्टोरी, जय किशन, हिना, इक्के पे इक्का सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. चांदणी दिल्ली येथील राहणारी होती. ती जेव्हा शिकत होती तेव्हा तिला एका जाहिरातीची ऑफर आली होती. पण यादरम्यान डायरेक्टर सावन कुमार त्यांच्या नवीन चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या शोधात होते आणि नवोदिताने त्यासाठी ऑडिशन दिले ज्यामध्ये ती सिलेक्ट झाली.

यादरम्यान सलमान खान मैंने प्यार किया चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आला होता. त्यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर चांदणी सोबत काम केले. अशामध्ये चांदणी देखील रातोरात चर्चेमध्ये आली. सलमान आणि चांदनीचा अभिनयच नाही तर त्यांच्यावर चित्रित केलेली गाणी अजून देखील दर्शकांच्या ओठांवर रेंगाळत असतात. पण चांदणी सध्या चित्रपटांपासून दूर आहे. ती १९९६ मध्ये रिलीज झालेल्या हाहाकार चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती.
यादरम्यान चांदणीने १९९६ मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या सतीश शर्मासोबत लग्न केले आणि ती विदेशामध्ये जाऊन राहिली. असे म्हंटले जाते कि आता चांदणी अमेरिकेच्या ओरलॅंडो येथे डान्स अकादमी चालवते. इथे तिचा C नावाने डांस स्टूडियो आहे जिथे ती इंडियन डांस शिकवते. तिला दोन मुली आहेत आणि ज्यांच्यासोबत ती नेहमी आपले फोटो शेयर करत असते. तिने आपल्या मुलींची नावे कपूर खानदानातील मुली करिश्मा आणि करीना यांच्यावरून ठेवली आहेत.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.