‘तुझ्यात मजा नाही…’ जेव्हा बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्याने समीरा रेड्डीबद्दल केले होते अ’श्लील वक्तव्य…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री समीर रेड्डी बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. समीर रेड्डी सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय राहते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. अभिनेत्रीने आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना तिला अनेकवेळा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. अभिनेत्रीने आपल्या करियरची सुरुवात साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून केली होती. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले होते कि, मी जेव्हा एक चित्रपट करत होते तेव्हा मला अचानक सांगण्यात आले कि चित्रपटामध्ये एक किसिंग सीन करायचा आहे.

पण असा सीन आधी चित्रपटामध्ये नव्हता, तेव्हा निर्माते मला म्हणाले कि तू याअगोदर मुसाफिर चित्रपटामध्ये असा सीन केला आहेस तर मग आता करायला काय हरकत आहे. मी असा सीन अगोदर केला आहे म्हणजे मी प्रत्येक चित्रपटामध्ये असा सीन करेन याला काही अर्थ होत नाही.

तेव्हा मला सांगण्यात आले कि तू पुन्हा विचार करत पण हे लक्षात ठेव कि आमच्याजवळ दुसरा कलाकार देखील आहे. दरम्यान समीराने एका बॉलीवूड अभिनेत्यासोबतचा अनुभव देखील शेयर केला. ती म्हणाली कि तो अभिनेता मला म्हणाला कि तू खूपच कंटाळवाणी आहेस. तुझ्यामध्ये काहीच मज्जा नाही.

मी तुज्यासोबत पुढे काम करेन का नाही याबद्दल माहित नाही. सरीराने अभिनेत्याचे नाव न घेता हा अनुभव शेयर केला होता. समीराने २००२ मध्ये सोहेल खानसोबत मैंने दिल तुझको दिया चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. अभिनेत्रीने हिंदी, तेलगु, तमिळ, मल्याळम आणि बंगाली चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. २०१८ मध्ये अभिनेत्रीने बिजनेसमॅन अक्षय वर्देसोबत लग्न केले होते. त्यांना हंस आणि नायरा नावाचे दोन मुले आहेत.

Leave a Comment