बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचा कॉफी विथ करण-७ शो नेहमी चर्चेमध्ये असतो. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट पोहोचले होते. यानंतर अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर पोहोचले होते ज्यांनी आपल्या पर्सनल लाईफमधील अनेक गुपिते उघड केले.
आता यानंतर तिसर्या एपिसोड अभिनेता अक्षय कुमार आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू पोहोचली होती. अक्षय कुमार यादरम्यान अनेक गोष्टी केल्या. तर समांथा रुथ प्रभूने आपल्या पर्सनल लाईफबद्दल देखील खुलासा केला. यादरम्यान समांथाने तिचा एक्स पती नागा चैतन्यसोबतच्या आपल्या नात्याबद्दल देखील खुलासा केला.
करण जोहर नेहमी आपल्या शोमध्ये सेलेब्सच्या पर्सनल लाईफसंबंधी बोलताना दिसतो. यादरम्यान जेव्हा करणने समांथाला विचारले कि तुला पतीपासून वेगळे होताना कसे वाटले यादरम्यान समांथा त्याला मधेच थांबवते आणि म्हणते कि एक्स पती. तेव्हा समांथा म्हणते कि मी याबद्दल कोणतीही तक्रार करू शकत नाही.
कारण मी पारदर्शकतेसाठी तो मार्ग निवडला आहे आणि मी यावरून आता जास्त अस्वस्थ होऊ शकत नाही कारण मी जीवनामध्ये गुंतवणूक केली आहे. त्यावेळी माझ्याजवळ उत्तर नव्हते. त्यावेळी मी ओके म्हंटले. हे खूपच कठीण होते, पण आता सर्वकाही चांगले आहे. मी मजबूत आहे.
यानंतर तेव्हा करणने अभिनेत्रीला विचारले कि तुमच्यामध्ये हार्ड फीलिंग्स आहेत का? यावर उत्तर देताना समांथा म्हणाली कि हार्ड फीलिंग्स आहे, जसे जर तुम्ही दोघे एकाच खोलीमध्ये असता आणि तीक्ष्ण गोष्टी लपवाव्या लागतात. आतापर्यंत, होय. तथापि भविष्यात संबंध चांगले असू शकतात.
समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचे लग्न २०१७ मध्ये झाले होते. या कपलचे लग्न साऊथ इंडस्ट्रीमधील शाही लग्नापैकी एक होते ज्यामध्ये साऊथ, बॉलीवूड आणि बिझनेस पॉलिटिकल जगतातील मोठ्या लोकांनी हजेरी लावली होती. इतकंच नाही तर या लग्नात १० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला होता, मात्र ४ वर्षांनंतर दोघांचं नातं तुटलं.
समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यने एक स्टेटमेंट जारी करून चाहत्यांना सांगितले होते कि आम्ही पती पत्नी म्हणून यापुढे राहू शकत नाही. असे म्हंटले जाते कि नागा चैतन्यपासून वेगळे झाल्यानंतर समांथा रुथ प्रभूने त्यांच्या कुटुंबाशी संबंधित प्रत्येक गोष्ट परत केली होती. माहितीनुसार समांथाने स्वतःजवळ नागा चैतन्यने दिलेली साडी देखील ठेवली नव्हती. समांथाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती शाकुंतलममध्ये दिसणार आहे याशिवाय ती अॅरेंजमेंट ऑफ लव्हमध्येही दिसणार आहे.