Sam Bahadur Box Office Collection Day 1: ‘एनिमल’ ला ‘सॅम बहादूर’ ने दिली जबरदस्त टक्कर, पहिल्याच दिवशी कमवले इतके करोड

By Viraltm Team

Published on:

Sam Bahadur Box Office Collection Day 1

Sam Bahadur Box Office Collection Day 1: 2023 बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला विक्की कौशल स्टारर ‘सॅम बहादूर’ चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आहे. भारतीय लष्करातील पहिले मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित असलेलेल्या चित्रपटाला पॉजिटिव रिस्पॉन्स मिळाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट रणबीर कपूरच्या एनिमलसोबत चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे.

रणबीरच्या चित्रपटाची क्रेज तर गगनाला भिडली आहे. पण असे असून देखील विक्की कौशलच्या चित्रपटाला दर्शकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. यासोबतच सॅम बहादूर चित्रपटाने चांगली ओपनिंग केली आहे. चला तर जाणून घेऊया विक्की कौशलच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले आहे.

Sam Bahadur Box Office Collection Day 1

सॅम बहादूर चे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. विक्की कौशलची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाची टक्कर रणबीर कपूरच्या एनिमल सोबत आहे. असे असून देखील सॅम बहादूर दर्शकांच्या पसंतीस उतरला आहे. विक्की कौशल (Vicky Kaushal) ने या चित्रपटातील माणेकशॉ यांच्या भूमिकेने प्रभाविक केले आहे. सोशल मिडियावर अभिनेता आणि त्याच्या चित्रपटाचे खूपच कौतुक केले जात आहे.

Sam Bahadur Box Office Collection Day 1

चित्रपटाच्या कमाई बद्दल बोलायचे झाले तर सॅम बहादूर च्या पहिल्या दिवसाचे प्रारंभिक आकडे (Sam Bahadur Box Office Collection Day 1) समोर आले आहेत. रिपोर्टनुसार सॅम बहादूरने रिलीजच्या पहिल्या दिवशी 5.50 करोडची कमाई केली आहे. यासोबतच हा चित्रपट विक्की कौशलच्या करियरमधील तिसरा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे.

वीकेंडची कमाई वाढण्याची शक्यता

रणबीर कपूरच्या एनिमल समोर सॅम बहादूर (Sam Bahadur) ची सुरुवात अतिशय संथ झाली. एनिमलने जिथे 60 करोडची ओपनिंग केली तर सॅम बहादूरचे पहिल्या दिवशी 5.50 करोड कलेक्शन राहिले. तथापि चित्रपटाचे खूपच कौतुक हॉट आहे आणि अशामध्ये या चित्रपटाला पॉजिटिव वर्ड ऑफ माउथचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे विकेंडमध्ये या चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ होऊ शकते. आता प्रत्येकाच्या नजरा बॉक्स ऑफिसवर टिकून आहेत.

Leave a Comment