प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. नुकतेच शहनाज गिल अर्पिता खान आणि आयुष्य शर्माच्या पार्टीमध्ये पोहोचली होती. जिथे सलमान खानसोबत तिची जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळाली. इतकेच नाही तर पार्टीमध्ये सलमान आणि शहनाज गिल दरम्यानच्या क्युट मुमेंट देखील समोर आले जे सोशल मिडियावर देखील चर्चेचा विषय बनले आहेत.
यादरम्यान शहनाज गिल कधी सलमान खानच्या गळ्यात पडून मस्ती करताना दिसली तर कधी त्याला कीस करताना दिसली. शहनाज सलमान खानचा हात पकडून आपल्या कार पर्यंत देखील घेऊन गेली होती. तर सोशल मिडियावर सध्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे आणि चाहते देखील त्यांचे खूपच कौतुक करत आहेत.
मंगळवारी सलमान खानची बहिण अर्पिता खानच्या घरी पार्टी ठेवली होती. ज्यामध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज कलाकार सामील झाले होते. या पार्टीमध्ये कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, कंगना रनौत, करण जौहर, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण सारखे मोठे कलाकार सामील झाले होते.
पण सर्वात जास्त पंजाबची कॅटरीना कैफ म्हणजेच शहनाज गिलनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येकाची नजर शहनाज गिलवरच खिळून होती. दरम्यान ती खूपच चर्चेमध्ये राहिली जेव्हा तिने सलमान खानची भेट घेतली. यावेळी सलमान खान आणि शहनाज गिलची जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळाली.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि शहनाज गिल सलमान खानच्या एकसारखे गळ्यात पडत होती. इतकेच नाही तर ती सलमान खानला कीस करताना देखील दिसली. याशिवाय शहनाज गिल सलमान खानला गाडीपर्यंत देखील घेऊन गेली. तर सलमान खान देखील आनंदाने शहनाज गिलसोबत गाडीपर्यंत जातो आणि तिला ड्रॉप करतो.
सलमान खान आणि शहनाज गिल यांच्यामधील बाँडिंग पाहून चाहते खूप खुश आहेत आणि सोशल मिडियावर कमेंट करून या बाँडिंगचे कौतुक करत आहेत. या पार्टीमध्ये शहनाज गिलने ब्लॅक कलरचा सूट घातला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय सलमानने ब्लॅक शर्ट कॅरी केला होता ज्यामध्ये तो नेहमीप्रमाणे हँडसम दिसत होता.
शहनाज गिलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच सलमान खानच्या कभी ईद कभी दिवाली चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार शहनाज गिल सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माच्या विरुद्ध काम करताना दिसेल.
तथापि आतापर्यंत या चित्रपटाबद्दल कोणतीही ऑफिशियल अनाउंसमेंट झालेली नाही आणि शहनाज गिलकडून देखील कोणतेही वक्तव्य झालेले नाही. पण ज्याप्रमाणे सलमान आणि शहनाज गिलची बाँडिंग पाहायला मिळत आहे त्यावरून असा अंदाज लावला जात आहे कि ती चित्रपटामध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram