सलमान खान आणि करिश्मा कपूरची जोडी बॉलीवूडमधील आवडत्या जोड्यांपैकी एक आहे. दोन्ही कलाकारांनी अनेक चित्रपट केले आहेत आणि बहुतेक चित्रपट हिट झाले आहेत. मोठ्या पडद्यावर या जोडीला खूप पसंद केले जात होते. करिश्मा कपूरने प्रसिद्ध व्यावसायिक संजय कपूरसोबत लग्न केले होते आणि तिला दोन मुले आहेत. पण काही वर्षांनंतर करिश्मा कपूरचा डिवोर्स झाला आणि बॉलीवूडचा दबंग खानदेखील अजून बॅचलर आहे.
गेल्या महिन्यांपासून सलमान खान आणि करिश्मा कपूरच्या लग्नाच्या जोरदार चर्चा होत आहेत. वास्तविक जेव्हा रणबीर आणि आलियाच्या लग्नामध्ये करिश्मा कपूर सामील झाली होती तेव्हा करिश्माच्या लग्नाच्या चर्चांनी जोर पकडला आहे. त्याचबरोबर चाहत्यांना सलमान आणि करिश्माची जोडी परफेक्ट वाटत आहे.
बॉलीवूडचा भाईजन आणि करिश्मा कपूरने बीवी नंबर वन ,दुल्हन हम ले जाएंगे, जुड़वा, अंदाज अपना अपना सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोन्ही स्टार्सची मोठ्या पडद्यावरील केमिस्ट्री आणि ऑफ सेट केमिस्ट्री वाखाणण्याजोगी आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी सलमान खानची बहिण अर्पिताच्या घरी ईदची शानदार पार्टी ऑर्गेनाइज करण्यात आली होती. ज्यामध्ये बॉलीवूडच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटीजसोबत करिश्मा कपूर देखील सामील झाली होती. आपल्या ऑफिशल इंस्टाग्रामवर करिश्माने सलमान खानसोबतचे काही फोटो शेयर केले होते. जे पाहिल्यानंतर चाहते असा अंदाज लावत आहे कि दोघांमध्ये आज देखील चांगली बॉन्डिंग आहे. फोटो शेयर करत करिश्माने with the OG eid Mubarak असे लिहिले होते.
करिश्माने फोटो शेयर करताच तिच्या या पोस्टवर धडाधड कमेंट येण्यास सुरु झाल्या. कोणी लिहिले कि ओह माय गॉड प्लीज आता लग्न करा. तर दुसऱ्या एकाने लिहिले कि तुम्ही दोघे मोठ्या पडद्यावर आणि बाहेर देखील सुंदर दिसता. करिश्माच नाही तर सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. पण आता सलमान आणि करिश्माच्या फोटोंवरून चाहते पुन्हा एकदा असा अंदाज लावत आहेत कि दोघे लवकरच लग्न करू शकतात, आणि दोघांनी लवकरच लग्न करावे.