वयाच्या ५६ व्या वर्षी २४ वर्षाने लहान ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पडला सलमान खान, शुटींगदरम्यान आले एकमेकांच्या जवळ…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीचा दबंग स्टार म्हणून ओळखला जाणारा सलमान खान पुन्हा एकदा आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. ऐश्वर्यापासून ते कॅटरीना कैफ सारख्या मोठ्या अभिनेत्रींसोबत आपल्या अफेयरमुळे चर्चेत राहिलेला सलमान खानचे नाव आता सध्या बॉलीवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री पूजा हेगडेसोबत जोडले जात आहे. माहितीनुसार सलमान खान आता पूजा हेगडेला डेट करत आहे.

सलमान खान त्याच्या अपकमिंग किसी का भाई किसी की जान चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. याशिवाय चित्रपटामध्ये शहनाज गिल आणि पलक तिवारी देखील पाहायला मिळणार आहेत. असे म्हंटले जात आहे कि या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सलमान आणि पूजा हेगडे एकमेकांच्या जवळ आले. माहितीनुसार पुझा हेगडे आणि सलमान खान एकमेकांना डेट करत आहेत.

सेल्फ एक्लेम्ड फिल्म क्रिटिक उमैर संधूने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, ब्रेकिंग न्यूज, टाऊन मध्ये एक नवीन कपल समोर आले आहे. मेगा स्टार सलमान खानला पूजा हेगडेवर प्रेम झाले आहे. सलमानच्या प्रोडक्शन हाऊसने पूजाला आपल्या दोन चित्रपटांसाठी साईन देखील केले आहे. हे दोघे कलाकार आता एकत्र वेळ घालवत आहेत आणि सलमानच्या जवळच्या मित्रानेही याची पुष्टी केली आहे.

चाहत्यांची नजर या ट्विटवर पडताच इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. तथापि यामध्ये किती तथ्य आहे हे कोणालाच माहिती नाही. अजूनपर्यंत सलमान आणि पूजा कडून या प्रकरणावर कोणतीची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पूजाने आपला जेव्हा आपला वाढदिवस साजरा केला होता तेव्हा सलमान देखील तिच्यसोबत पाहायला मिळाला होता आणि यादरम्यानचे दोघांचे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले होते. अनेक युजर्सनी तर असा अंदाज लावला होता कि पूजा आणि सलमान एकमेकांना डेट करत आहेत.

सलमानच्या अफेयर्सबद्दल बोलायचे झाले तर करियरच्या सुरुवातीला त्याचे नाव अभिनेत्री सोमी अली सोबत जोडले गेले ह्तोये, पण लवकरच दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. सोमी अलीनंतर सलमान खानचे नाव संगीता बिजलानीसोबत जोडले, पण त्यांचे नाते देखील लवकर तुटले. यानंतर त्याच्या लाईफमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय आली आणि दोघांनी जवळ जवळ ४ वर्षे एकमेकांना डेट केले. पण त्यांच्या लव्ह स्टोरीचा देखील अंत झाला. यानंतर सलमान खानने प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरीना कैफला देखील डेट केले, पण त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. यानंतर सलमान खानचे नाव जॅकलिन, जरीन खान आणि यूलिया वंतूर सारख्या अभिनेत्रींसोबत देखील जोडले गेले.

Leave a Comment