सारा अली खान अल्पावधीमध्येच बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींचा पंक्तीमध्ये जाऊन बाली आहे. आधी तिची ओळख फक्त सैफ आली खानची मुलगी म्हणूनच होती. पण आता ती बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
त्याचबरोबर साराचे तिच्या सावत्र आई करीनासोबत कसे रिलेशन आहे हे देखील जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते. साराला जेव्हा एका मुलाखती दरम्यान विचारले गेले होते कि तिचे आणि करीनाचे कसे संबंध आहेत ? यावर उत्तर देताना सारा म्हणाली होती कि आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत.
सारा एकदा करीनाच्या व्हॉट वुमन वांट या शोमध्ये आली होती. या शोमध्ये बॉलीवूड सेलेब्रिटी आपल्या पर्सनल आयुष्याविषयी अनेक खुलासे करत असतात. दरम्यान साराला करीनाने अनेक प्रश्न शोदरम्यान विचारले होते. साराने देखील आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.
यादरम्यान करीनाने साराला एक रोमँटिक प्रश्न देखील विचारला होता. सुरवातीला सारा थोडी स्तब्ध झाली होती पण नंतर तिने या प्रश्नाचे चांगले उत्तर दिले होते. करीनाने विचारले होते कि तू कधी कोणाला रोमँटिक मेसेज पाठवले आहेस का ? कधी कोणाला रात्रभर मेसेजवर बोलली आहेस का ?
यावर उत्तर देताना सारा म्हणाली होती कि होय असे भरपूर वेळा केले आहे. करीनाने यापुढे हसून म्हंटले होते कि मला अशा आहे कि तुझे वडील हा शो पाहत नसतील. करीना या शोमध्ये अनेक वेळा बऱ्याच विषयांवर सेलेब्रिटींसोबत चर्चा करत असते.
करीना शोदरम्यान मॉडर्न रिलेशनशिपबद्दल देखील सारा आली खान सोबत बोलली होती. सारा बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सैफ ली खानची मुलगी आहे. सैफ अली खानने करीनासोबत लग्न करण्यापूर्वी अमृता सिंगसोबत लग्न केले होते. सारा सैफ आणि अमृताची मुलगी आहे.