खूपच कमी काळामध्ये ऋषभ पंत भारताचा स्टार क्रिकेटर बनला आहे. भारतीय क्रिकेट टीमसाठी ऋषभने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये डेब्यू केला आहे आणि आता तो टीमचा एक अभिन्न भाग बनला आहे. ऋषभ पंत त्याच्या तुफानी फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तो आपल्या यष्टिरक्षणातही सातत्याने सुधारणा करत आहे.
सध्या भारतीय क्रिकेट टीम रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आपली कमाल दाखवत आहे. तथापि ऋषभला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. तो लवकरच संघामध्ये सामील होणार आहे. २७ ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होत आहे.
आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट टीममध्ये ऋषभ पंतची निवड झाली आहे. UAE मध्ये आशिया कपचे नियोजन केले जाणार आहे. ऋषभ आपल्या खेळासोबतच आपल्या पर्सनल आयुष्यामुळेदेखील खूप चर्चेमध्ये आहे. ऋषभ पंतचे नाव त्याच्यासोबत चार वर्षाने मोठी अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत जोडले गेले होते.
उर्वशी आणि ऋषभचे नाते खूपच चर्चेमध्ये राहिले पण दोघांचे नाते खूपच लवकरच तुटले होते. आता ऋषभ ईशा नेगीला डेट करत आहे. ईशा नेगी उर्वशी सारखीच खूपच हॉट आणि बोल्ड आहे. ती बोल्डनेसच्या बाबतीत हिंदी चित्रपटांमधील अनेक मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते.
इशा नेगी सोशल मिडियावर खूपच सक्रीय आणि लोकप्रिय आहे. इशाच्या इंस्टाग्रामवर लाखोंवर चाहत्याची संख्या आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाच्या गर्लफ्रेंडचे इंस्टाग्रामवर दोन लाखपेक्षा जास्त फ़ॉलोअर्स आहेत. ती नेहमी आपल्या बोल्डनेसची झलक युजर्सला दाखवत असते.
View this post on Instagram
ऋषभ पंतची गर्लफ्रेंड इशा नेगी इंटीरियर डिजाइनर आहे. ऋषभने स्वतः इशासोबत नात्याची घोषणा सोशल मिडियाच्या माध्यमातून एक फोटो शेयर करून केली होती. ऋषभ जिथे दिल्लीचा निवासी आहे तर त्याची गर्लफ्रेंड इशा नेगी उत्तराखंडची राजधानी देहरादूनची राहणारी आहे. तिने देहरादूनमधूनच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. इशा आणि पंत यांना एकमेकांना डेट करून आता चांगला काळ झाला आहे. दोघांच्या नात्याची माहिती २०२० मध्ये लोकांसमोर आली होती. तेव्हा ऋषभने स्वतः सोशल मिडियावर पोस्ट करून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते.