क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला मोठा अ’पघा’त. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात भरती..

By Viraltm Team

Published on:

भारतीय टीमचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आहे. हि घटना रूडकीच्या गुरुकुल नारसन क्षेत्रमध्ये शुक्रवारी पहाटे झाली. भारतीय स्टार क्रिकेटरचे काही फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

२५ वर्षाचा ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली. या घटनेनंतर कारला भीषण आग लागली, असे म्हंटले जात आहे कि कारची खिडकी तोडून तो बाहेर आला. घटनेनंतर पंतला हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले आहे. डॉक्टरांनुसार ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. सध्या पंतला मॅक्स डेहराडूनला रेफर करण्यात आले आहे.

ऋषभ पंतसोबत झालेल्या अपघाताचा काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. डॉक्टरांनी सांगितले कि पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याची तपासणी सुरु आहे. असे म्हंटले जात आहे कि दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर तेथील लोकांनी १०८ ला मदत मागितली आणि ऋषभ पंतला रूडकीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले गले. आधीच अनफिट असलेल्या पंतला बीसीसीआयने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) अहवाल देण्यास सांगितले होते.

भारतीय क्रिकेट टीमला पुढची सिरीज आपल्या घरामध्ये श्रीलंकासोबत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये खेळायची आहे. भारत आणि श्रीलंकादरम्यान टी२० आणि वनडे सीरीज होणोर आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा देखील करण्यात आली आहे. पण सध्या दोन्हीहि सिरीजमधून ऋषभ पंतला बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याला बाहेर करण्याचे बीसीसीआईने कोणतेही कारण सांगितलेले नाही.

ऋषभ पंतने भारतातर्फे खेळताना ३३ कासोडी खेळल्या आहेत ज्यामध्ये त्याने २२७१ धावा आणि ५ शतके केली आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३० सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ८६५ धावा बनवल्या आहेत आणि एक शकत केले आहे. तर ६६ टी२० सामन्यांमध्ये त्याने ९८७ धावा बनवल्या आहेत आणि ३ अर्धशतके केले आहेत.

ऋषभ पंतने नुकतेच बांग्लादेश दौऱ्यावर कसोटी मालिका खेळली होती. त्याने आपला शेवटचा सामना २२ डिसेंबर रोजी ढाकामध्ये खेळला होता, ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात ९३ धावा आणि दुसऱ्या डावात ९ धावा बनवल्या होत्या. आता पंतला इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये देखील खेळायचे आहे. तो दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल संघाचा कर्णधार आहे.

Leave a Comment