बॉलीवूड अभिनेत्री रेखा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेमध्ये असते. रेखाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात साउथ फिल्म रंगूला रत्नम मधून केली होती. तिने या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. लोकांना हे जाणून घेण्याची नेहमी उत्सुकता असते कि रेखा कोणाच्या नावाने सिंदूर लावत असते. रेखाची सेक्रेटरी फरजानामुळे सुद्धा लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित राहत असतात.
रेखा आणि फरजाना यांच्यामध्ये कोणते नाते आहे हे जाणण्यासाठी लोक नेहमी उत्सुक असतात. फरजानाच्या बाबतीत काय काय लिहिले गेले आहे हे किती वास्तविक आहे हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. तुम्ही रेखासोबत नेहमी एक महिला पाहत आला असाल जिला रेखाची परछाईच म्हंटले जाते. या महिलेचे नाव फरजाना असे आहे. ती ३२ वर्षांपासून रेखासोबत आहे.मोह्नदीप नावाच्या पत्रकाराने त्याच्या पुस्तकामध्ये रेखाची सेक्रेटरी फरजानाबद्दल बरेच काही लिहून ठेवले आहे. या पुस्तकानुसार रेखाचे तिची सेक्रेटरी फरजानासोबत खूप जवळचे नाते आहे. फरजाना नेहमी पुरुषांच्या सारखे कपडे वापरत असते. मोह्नदीपने त्यांच्या पुस्तकामध्ये रेखाच्या बेडरूमबद्दल अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे कि रेखाच्या बेडरूममध्ये कोणालाही जाण्याची परवानगी नाही. परंतु फरजानाला त्यांच्या रूममध्ये येण्या-जाण्याची पूर्ण सूट आहे.त्याचबरोबर पत्रकार मालविका संघवीने सुद्धा म्हंटले होते कि रेखा फरजानाशिवाय नाही राहू शकत. फरजानाला माहित आहे कि रेखाला कोणत्या गोष्टींपासून त्रास आहे. या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे हे आम्हाला ठाऊक नाही. पण रेखा तिच्या सेक्रेटरी फरजानाला आपली बहिण मानते.