१५ वर्षाच्या रेखाला ५ मिनिटं अभिनेता जबरदस्ती करत होता कीस, रेखाची अशी झाली होती हालत…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री रेखा बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री एव्हरग्रीन अभिनेत्री आहे. वयाच्या तेराव्या वर्षांपासून रेखा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. आज देखील रेखा आपली भूमिका तितक्याच दमदार पद्धतीने सांभाळते. अभिनेत्री रेखाच्या अनेक वेळा अफवा उठल्या होत्या, अनेक गॉसिप्स समोर आले होते पण त्यामधून देखील रेखा जोमाने उभी राहिली.

रेखा इंडस्ट्रीमध्ये नवीन होती. यादरम्यान रेखाच्या आईने तिची खूप काळजी घेतली होती. चित्रपटाच्या शुटींगदरम्यान रेखाची आई चित्रपट निर्मात्यांना विशेष सूचना देखील द्यायची. रेखाच्या जेवणामध्ये कोणती कमतरता नाही ना याची देखील ती आवर्जून चौकशी करायची.

रेखा जेव्हा मुंबईमध्ये नवीन होती तेव्हा तिला मुंबईची भाषा अंगवळणी पडायला खूपच कठीण जात होते. अनेकवेळा तिला भाषेमुळे चेष्टेचा सामना करावा लागत होता. अंजना सफर या चित्रपटाच्या शुटींगवेळी रेखाला खूपच वाईट अनुभव आला होता. चित्रपटामध्ये एक किसिंग सीन होता.

यावेळी रेखा इतकी घाबरली होती कि तिने स्पष्टपणे हा सीन करण्यास नकार दिला होता. पण चित्रपटामधील सीनची गरज समजावून सांगितल्यानंतर ती सीनसाठी तयार झाली. पण रेखा त्यावेळी इतकी घाबरली होती कि तिची भीती कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत होती. दरम्यान सीन शूट करताना रेखा बेशुद्ध पडली होती.

चित्रपटामधील रेखाच्या या सीनमुळे खूपच वाद झाला होता. चित्रपटामधील सीन हटवण्याची देखील मागणी करण्यात आली होती. यांनतर हा चित्रपट तब्बल १० वर्षानंतर रिलीज झाला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे दहा वर्षानंनतर चित्रपट सेन्सर बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. चित्रपट दो शिकारी या नावाने १९७९ मध्ये रिलीज करण्यात आला होता.

Leave a Comment