बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू होऊन खूप काळ लोटला आहे. सशांतचा मृत्यु झाल्यापासून आतापर्यंत रोज नव नवीन खुलासे येत आहेत. काही दिवसापूर्वी सुशांत सिंग केस प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशीस परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णयावर सुशांत सिंगच्या परिवाराने संतुष्टी दाखवली . गुरुवारी रात्री सीबीआयचे अधिकारी सुशांत सिंह केस प्रकरणाचा तपास करण्याकरिता मुंबईत आले आहेत. याचदरम्यान मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती आणि महेश भट यांच्याशी रियाने केलेले व्हाट्सअप चॅट व्हायरल झाल आहे. व्हाट्सअप चॅट मध्ये आश्चर्यचकित करणार्‍या काही गोष्टी समोर आल्या आहेत.लीक झालेल्या व्हाट्सअप चॅट मधून कळत आहे की, रिया सुशांत सोबतच्या रिलेशनशिपमध्ये खुश नव्हती. रिया चक्रवर्तीला सुशांत सिंग सोबतचे रिलेशनशिप तोडून टाकायचं होतं. त्यामध्ये महेश भट प्रामुख्याने रियाला मदत करत होते. व्हाट्सअप चॅटवर प्रामुख्याने समोर आली आहे की, रिया चक्रवर्ती चे वडील इंद्रजीत चक्रवर्ती या रिलेशनशिपवर खुश नव्हते. रियाने सुशांतचे घर सोडल्यानंतर रियाचे महेश भट्ट सोबतची व्हाट्सअप चॅटवर चॅटिंग झाली होती.
रिया महेश भेटला लिहिते की, आयेशा आता पुढे गेली आहे सर, आपल्या सोबत च्या शेवटच्या बोलण्याने माझे डोळे उघडले आहेत. आपण माझ्यासाठी देवदूत आहात. त्या वेळीही होता आणि आता ही देवदूत आहोत . जिलेबी या चित्रपटात रिया चक्रवर्तीचे भूमिकेतील नाव आयेशा होते. रियाच्या ह्या मेसेजच महेश भटने उत्तर दिले. ते उत्तर खरंच आश्चर्यचकित करणारे आहे. महेश भट रियाच्या मेसेज नंतर लिहितात कि, आता तु मागे वळून पाहू नको. तुझ्या वडिलांना माझं प्रेम दे. आता ते खूप खुश असतील.महेश भट यामध्ये रियाच्या वडिलाला मध्ये घेऊन येत आहेत. यावरून कळते की रियाचे वडीलही सुशांत व रिया चक्रवर्तीच्या रिलेशनशिपवर खुश नव्हते. रियाच्या वडिलाला पण रिया आणि सुशांत वेगळे व्हावे असं वाटत होतं. नंतर व्हाट्सअप चॅटवर रिया लिहिते की, आता कशी तरी हिंमत मिळाली आहे. आपण फोनवर माझ्या वडिलांबद्दल म्हणाला होतात. त्या गोष्टीने मला मजबूत होण्यासाठी प्रेरित केल आहे. तुम्ही त्यांच्यासाठी खास असल्यामुळे ते तुम्हाला खुप सारे प्रेम आणि धन्यवाद देतात.
त्यानंतर महेश भट लिहितात की, तू माझी मुलगी आहेस. आता माझं मन हलकं वाटत आहे. यावर रिया म्हणते की, काहीच शब्द नाहीत. तुमच्या बोलण्याने मनात चांगली भावना निर्माण होते.तुमच्यासाठी मनात उत्पन्न होते.त्यानंतर पुन्हा महेश भट्ट कडून एक मेसेज येतो. त्यामध्ये महेश भट म्हणतात की. दूर होण्यासाठी धन्यवाद. त्यानंतर आणखीन एक मेसेज रियाने लिहिला आहे. त्यात रिया लिहिते की तुम्ही मला आज स्वतंत्र केल आहे. आपण माझ्या आयुष्यात देवासारखे आहात.यानंतर महेश भट रियाला हॅपी बर्थडे लिहितात. कारण सुशांत आणि रिया रिलेशनशिप मधून मुक्त होण्यालाच महेश भट रियाचा नवा जन्म मानत आहेत. यानंतर रिया लिहिते की तुमच्यावर खुप प्रेम करते. शेवटी महेश भट यांची प्रशंसा करीत लिहितात की, जे केलस त्यासाठी खूप हिम्मत पाहिजे. मागे वळून पाहू नकोस.
दोघाच्या व्हाट्सअप वरिल चॅट मधून असं वाटते की, रियाला खूप दिवसापासून सुशांतच घर सोडायचं होतं. सुशांतच घर सोडल्यानंतर रियाला खूप मोकळं आणि हलकं वाटत होतं. ती आपल्या निर्णयावर खूप खुश होती.
सीबीआयकडे तपास गेल्याने सीबीआय सुशांत सिंह प्रकरणाचा क्राइम सीन रीक्रिएट करून तपास करणार आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास ककरण्याकरिता ही खास पद्धत अवलंबनार असल्याने खरं सत्य जगासमोर येण्यास मदत होणार आहे.त्यामुळे सुशांतला न्याय मिळून आरोपीस शिक्षा होण्यास मदत होईल.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.