बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्री रविना टंडन आज ४८ वर्षाची झाली आहे. रविनाचा जन्म २६ ऑक्टोबर १९७४ रोजी बॉलीवूडचे प्रसिद्ध प्रोड्युसर लेख टंडनच्या घरी झाला होता. लहानपणापासून घर्मध्ये फिल्मी वातावरण असल्यामुळे तिने चित्रपटांमध्ये आपले करियर बनवण्याचा निर्णय घेतला. इंडस्ट्रीमध्ये तिने १९९१ मध्ये पत्थर के फूल चित्रपटामधून एंट्री केली होती. या चित्रपटामध्ये तिने सलमान खानसोबत काम केले होते. चित्रपट सुपरहिट झाला होता आणि पहिल्याच चित्रपटामध्ये तिला न्यू फेस म्हणून फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला होता.
तिने आपल्या करियरमध्ये अनेक हिट चित्रपट केले. रविना प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमुळे देखील नेहमीच चर्चेमध्ये राहिली. तिच्या अफेयर्सच्या चर्चा आजदेखील कमी होत नाहीत. असे म्हंटले जाते कि आपल्या प्रेमासाठी ती करिश्मा कपूरसोबत भांडली होती.
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक स्टार्स आहेत, ज्याचे एकमेकांसोबत जमत नाही. शाहरुख खान-सलमान खानदरम्यान बऱ्याच दिवसांपासून मतभेद आहेत तर प्रियांका चोप्रा आणि करीना कपूरमध्ये देखील नाते चांगले राहिले नाही. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सेलेब्स दरम्यान कोल्ड वॉर नेहमी सुरु असते. यामधीलच एक वॉर रविना टंडन आणि करिश्मा कपूर दरम्यान देखील राहिले.
माहितीनुसार दोघी एकाच वेळी अजय देवगनच्या प्रेमात पागल झाल्या होत्या. यादरम्यान दोघी आतिश चित्रपटाची शुटींग करत होत्या ज्याची कोरियोग्राफर फराह खान होती. फराह खानने एका चॅट शोमध्ये खुलासा केला होता कि दोघी एकत्र चित्रपटाचे गाणे शूट करत होत्या आणि अचानक दोघींमध्ये भांडण सुरु झाले.
फराहने सांगितले कि दोघींमध्ये कोणतीच बातचीत झाली नाही आणि दोघी अचानक एकमेकींना मारहाण करू लागल्या. दोघींची हरकत पाहून सेटवरील करू आणि इतर कर्मचारी देखील थक्क झाले. दोघींनी अंदाज अपना अपना चित्रपटामध्ये देखील एकत्र काम केले होते, पण सेटवर दोघी एकमेकींना पाहायला देखील तयार नव्हत्या. चित्रपटाचे प्रमोशन देखील दोघींनी एकत्र केले नव्हते.
रविना टंडनच्या करियरबद्दल बोलायचे झाले तर ती अजूनदेखील इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. या वर्षी ती वेब सिरीजसोबत केजीएफ २ चित्रपटामध्ये देखील दिसली होती. सध्या तिच्या अपकमिंग घुड़चढ़ी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. रविना टंडनने आपल्या करियरमध्ये इंडस्ट्रीमधील सर्व सुपरस्टार्ससोबत काम केले. ती गोविंदा, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अजय देवगन, अनिल कपूर, संजय दत्त, सनी देओल सहित अनेक स्टार्ससोबत दिली.