क्रिकेटर रवी शास्त्री त्याच्या काळामध्ये खूपच प्रसिद्ध क्रिकेटर राहिला आहे. क्रिकेटरमधून निवृत्त झाल्यानंतर त्याने क्रिकेट कमेंट्री आणि बीसीसीआईचा कोच म्हणून अनेक काळ घालवला. सध्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये सगळीकडे फक्त प्रेमाची चर्चा होत आहे आहे अशामध्ये आज आपण क्रिकेटर रवी शास्त्रीच्या लव्ह अफेयरबद्दल जाणून घेणार आहोत.
क्रिकेटर रवी शास्त्रीचे अफेयर त्या काळातील बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अंतुर सिंह सोबत रहिले होते. दोघांच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. दोघे आपल्या प्रेमाला एक नाव देऊ इच्छित होते पण रवी शास्त्रीच्या एका अटीमुळे त्यांचे नाते तुटले होते.
वास्तविक रवी शास्त्रीने अमृता सिंह समोर एक अट ठेवली होती कि त्याला एक घरगुती पत्नी हवी होती आणि अमृता सिंहला लग्नानंतर बॉलीवूडपासून दूर जावे लागले. यावर अमृताने त्याच्यासोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला होता. नंतर अमृताने तिच्यापेक्षा १२ वर्षाने लहान छोटे नवाब सैफ अली खानसोबत लग्न केले. या लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली.
त्याची मुलगी सारा अली खान जी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २००४ मध्ये दोघे घटस्फोट घेऊन वेगळे झाले. अमृता सिंह पासून वेगळे झाल्यानंतर सैफ अली खानने बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले. अमृता सिंह सध्या एकटीच राहते.