बॉलीवूडची टिप टिप गर्ल रविना टंडनची मुलगी चित्रपटामध्ये डेब्यू करण्यासाठी तयार झाली आहे. दिग्दर्शक अशिषेक कपूरचा आगामी अॅक्शन अॅडव्हेंचर चित्रपट यामुळेच खूप चर्चेमध्ये आला आहे. रविना टंडनची मुलगी राशा अभिषेक कपूरच्या याच चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे आणि याच चित्रपटामध्ये अजय देवगनचा पुतण्या अमन देवगन देखील बॉलीवूडमध्ये एंट्री करत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगनदेखील दिसणार आहे.
चित्रपटामध्ये राशा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. माहितीनुसार चंडीगढ़ करे आशिकी नंतर चित्रपट निर्माता अभिषेक कपूरने रविना टंडनची मुलगी राशाला आपल्या आगामी चित्रपटासाठी साईन केले आहे. असे म्हंटले जात आहे कि या चित्रपटाची शुटींग उन्हाळ्यामध्ये सुरु होणार आहे.
चित्रपटाची स्टोरी काय आहे याबदल कोणतीची माहिती समोर आलेली नाही. असे म्हंटले जात आहे कि अभिषेक बॉलीवूडमधील दोन मोठ्या स्टार किड्स राशा टंडन आणि अमन देवगनला आपल्या चित्रपटामधून लॉन्च करणार आहे. असे देखील म्हंटले जात आहे कि अजय देवगन या चित्रपटामध्ये अशा अंदाजामध्ये दिसणार आहे जो याआधी कधीच पाहायला मिळालेला नाही. आता प्रत्येकाची नजर राशावर टिकली आहे, जिच्या बॉलीवूड डेब्यूसाठी रविना टंडनचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
अमन देवगन आणि राशाच्या या नवी जोडीला या वर्षाच्या मोस्ट अवेटेड लॉन्चिंग म्हंटले जात आहे. अभिषेक कपूरने याआधी केदारनाथ चित्रपटामधून सारा अली खानला बॉलीवूडमध्ये लॉन्च केले होते. इंडस्ट्रीमधील लोकांचे म्हणणे आहे कि गेल्या १५ वर्षामध्ये अभिषेक कपूरचे योगदान खूपच कौतुकास्पद आहे. त्याने सुशांत सिंह राजपूत, फरहान अख्तर, राजकुमार राव, सारा अली खान आणि इतर अनेक लोकांना लॉन्च केले आहे. अशामध्ये आता चाहत्यांना आशा आहे कि रविनाची काढली मुलगी राशाची सुरुवात खूपच दमदार होणार आहे.
रविना टंडनची मुलगी राशाचे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. राशा मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. राशाच्या शाळेमध्ये तिचा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता आणि रविनाने मुलीसाठी एक इमोशनल पोस्ट देखील लिहिली होती. तिने लिहिले होते कि प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे हा भावनिक क्षण असतो. बाळ आता घरटे सोडायला तयार आहे, ते किती मोठे झाले आहे. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते.
View this post on Instagram