पुष्पा २ मध्ये श्रीवल्लीच्या रोलवर चालवण्यात आली कात्री ? या खास कारणामुळे सगळीकडे होत आहे चर्चा…

By Viraltm Team

Updated on:

पुष्पाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कि पुष्पा २ चा मुहूर्त संपन्न झाला आहे. आणि दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांची टीमने चित्रपटाची स्टोरी फायनल केली आहे, लोकेशनची निवड केली आहे, कलाकार फायनल झाले आहेत आणि शुटींग लवकरच सुरु होणार आहे.

पण जर पुष्पासोबत श्रीवाल्लीचे चाहते असाल तर तुम्हालादेखील नक्की वाटत असेल कि श्रीवल्लीची भूमिका पुष्पा २ मध्ये देखील मोठी असावी. पण सध्या खूपच चर्चा होत आहेत कि सिक्वेलमध्ये श्रीवल्लीची भूमिका पहिल्यापेक्षा छोटी असू शकते. कारण आहे कि दिग्दर्शक शुटींगचे जे पहिले शेड्यूल बनवत आहेत त्यामध्ये श्रीवल्लीची भूमिका करणारी रश्मिका मंदानाला बोलावण्यात आले नाही.

दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांची टीम रात्रंदिवस चित्रपटावर काम करत आहे. चित्रपटांसंबंधी सूत्रांच्या माहितीनुसार दुसऱ्या पार्टसाठी कलाकारांचा लुक टेस्ट झाला आहे आणि दिग्दर्शकाने आपल्याकडून ओके केले आहे. गेल्या आठवड्यामध्ये हैदराबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लुक टेस्टची अंतिम फेरी पार पडली.

सर्वांची नजर यावर होती कि मेकर्सने पुष्पा म्हणजे अल्लू अर्जुनच्या लुकमध्ये काय बदल केले आहेत. असे म्हंटले जात आहे कि पुष्पराजच्या लुकसोबत जास्त छेडछाड केलेली नाही आणि त्याचा पहिला लुक आहे तसाच ठेवला गेला आहे. जे थोडे बदल आहेत ते फक्त त्याच्या कपड्याच्या स्टाईवरून करण्यात आले आहेत.

पुष्पा २ मध्ये अनेक नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. अशा अनेक लोकांना चित्रपटामध्ये संधी मिळाली आहे, जे पुष्पाचे चाहते आहेत आणि पहिल्या चित्रपटामध्ये दिसले नाहीत. लवकरच पुष्पा २ ची शुटींग सुरु होणार आहे. यामध्ये पुष्पा आणि त्याच्या गँगशी संबंधित लोकांचे सीन शूट केले जाणार आहेत. हे शुटींगचे पहिले शेड्यूल असेल.

पण पहिल्या पार्टमध्ये श्रीवल्लीसोबत पुष्पाचे लग्न दाखवून देखील या शेड्यूलमध्ये रश्मिका मंदानाला बोलावले गेले नाही. महतीनुसार पहिल्या शेड्यूलमध्ये पुष्पाला आपल्या गँगसोबत मजा मस्ती करताना शूट करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर एक गाणे चित्रित करण्यात येणार आहे. यानंतर चित्रपटाची स्टोरी शूट करण्यास सुरुवात होईल.

Leave a Comment